मुंबई | टीम इंडिया आयपीएल 16 व्या मोसमानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर 7 ते 11 जूनदरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर सामन्यात पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणाने अडथळा येऊन वेळ वाया जाऊ नये, यासाठीही आयसीसीने खबरदारी घेतली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे जर दिवस वाया गेला, तर त्या दिवसाचा खेळ हा राखीव दिवशी खेळवण्यात येईल. त्यामुळे या सामन्याचा निकाल निघणार हे शंभर टक्के. या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली आहे.
या महामुकाबल्याला मोजून एक महिना बाकी आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचे बरेचसे खेळाडू हे दुखापतीच्या कचाट्यात सापडले आहेत. यामध्ये शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि केएल राहुल या तिघांना दुखापतीने ग्रासलंय. डोकेदुखी म्हणजे केएल राहुल याला आयपीएलमध्ये 1 मे रोजी आरसीबी विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग दरम्यान मांडीला दुखापत झाली. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन असलेल्या केएल राहुल याला या आयपीएल 16 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात सीरिअस वातावरण होतं. मात्र ज्या आयपीएलमुळे केएल याला बाहेर पडावं लागलं, त्याच आयपीएलमधून टीम इंडियाला केएलचा पर्याय मिळाला आहे.
आयपीएलचा 16 व्या मोसमातील 51 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. लखनऊने या सामन्यात टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातकडून अनुभवी विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा याने एकदम कडक बॅटिंग केली. ऋद्धीमानने अवघ्या 43 बॉलमध्ये 10 चौकार आणि 4 खणखणीत षटकारांच्या मदतीने 81 धावांची जबरदस्त खेळी केली.
ऋद्धीमानने यासह निवड समितीला आपल्याकडे केएल राहुल याची बदली खेळाडू म्हणून पाहण्यासाठी भाग पाडलंय. विशेष बाब म्हणजे केएल आणि ऋद्धीमान हे दोघे विकेटकीपर बॅट्समन आहे. त्यामुळे ऋद्धीमान याची इशान किशन याच्या तुलनेत निवड होण्याची अधिक शक्यता आहे. ऋद्धीमान इशानच्या तुलनने अनुभवी आहे. तसेच अनेक बाबतीत ऋद्धीमान हा अनुभवी आहे. यामुळे आता केएल राहुल याच्या जागी ऋद्धीमानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये संधी द्यायला हवी, असं नेटकऱ्याचं म्हणनं आहे.
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.