गांधीनगर | बॉक्स ऑफिसवर 21 एप्रिल रोजी भाईजान सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर जोरदार धुमाकूळ घालतोय. क्रिकेट चाहत्यांना आज 25 एप्रिल रोजी आयपीएल 16 व्या सिजनमध्ये या सिनेमाची झलक पाहायला मिळणार आहे. काही समजलं नाही ना, आम्ही समजवून सांगतो. या 16 व्या सिजनमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत.
गतविजेता गुजरात टायटन्स आणि 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्स यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. मुंबईची कॅप्टन्सनी रोहित शर्मा करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे गुजरातची धुरा आहे. त्याआधी सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सारासाठी हा सामना फार चॅलेंजिंग असेल, असं नेटकऱ्यांचं मत आहे. एका बाजूला साराचा भाऊ अर्जुन हा मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला शुबमन गिल. त्यामुळे नक्की सपोर्ट कुणाला करणार, अशा शब्दात नेटकऱ्यांनी साराची फिरकी घेतली आहे.
किसी का भाई किसी की जान
Only Legends can understand this.
??#GTvKKR | #GTvsKKR | #TATAIPL#KKRvGT | #KKRvsGT | #AavaDe #MIPaltan | #TATAIPL2023#ShubmanGill | #ArjunTendulkar pic.twitter.com/zaYfilbX2z— ????? (@ItsmeAK4Tsay1) April 19, 2023
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.
This World is Not Ready For This Battle.
??#GTvsMI #ShubhmanGill
Sara.#KisiKaBhaiKisiKiJaan pic.twitter.com/QPyTYlQA0J— RavY¹⁸ (@Ra_ViraT18) April 20, 2023
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुधारसन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.