मुंबई : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये गुजरातने धुमधडाकेबाज खेळी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 207 धावांचा डोंगर उभारला आहे. गुजरातच्या शुबमन गिल 56 धावा, अभिनव मनोहर 42 धावा , डेव्हिड मिलर 46 धावा यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर गुजरात संघाने 200 चा आकडा पार केला. आज पुन्हा एकदा मुंबईची गोलंदाजी किती ढिसार आहे ती उघडी पडली. आधीच्यांनी कमी फोडलं नाहीतर शेवटला आलेल्या राहुल तेवतिया याने 400 च्या स्ट्राईक रेटने 20 धावा केल्या.
राहुलने पाच बॉल खेळले यामध्ये त्याने 3 षटकार मारत नाबाद 20 धावांची खेळी केली. पहिल्याच बॉलपासून राहुलने मुंबईच्या गोलंदाजांना फोडायला सुरूवात केली. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने दोन षटकार मारत कडक सुरूवात केली होती. तिसऱ्या चेंडूवर एकच धाव घेता आली. राहुल याला जर आणखी 10 चेंडू मिळाले असते तर त्याने संघाला आणखी धावा करून दिल्या असत्या.
Ate hi suru kr diye ?? Rahul tewatia #IPL23 #Cricket #WTCFinal #WTCFinal2023 #GTvMI #MIvsGT pic.twitter.com/5Qcm3ajUiY
— Raj mohurle (@Rajmohurle_15) April 25, 2023
गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं आहे. गुजरातने 6 विकेट्स गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 207 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. गिल याने 7 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. मिलरने अखेरच्या काही चेंडूंपर्यंत जोरदार फटकेबाजी करत 22 बॉलमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. अभिनव मनोहर यानेही टॉप गिअर टाकत 21 बॉलमध्ये 42 रन्सची इनिंग केली.
अखेरच्या काही बॉलमध्ये राहुल तेवितिया याने 5 बॉलमध्ये 3 सिक्ससह नाबाद 20 धावा केल्या. तर विजय शंकर याने 19, कॅप्टन हार्दिक पंड्या याने 13, ऋद्धीमान साहा याने 4 आणि राशिद खाने याने 2* धावा केल्या. मुंबईकडून पियूष चावला याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, बेहरनडॉर्फ आणि रिले मेरेडिथ या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नदीम अहमद.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, के कार्तिकेय सिंग, एन वडेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.