मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना एकदम रोमांचक झालेला पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआर संघाला तब्बल 29 धावांची गरज होती, त्यामुळे हा सामना संपूर्णपणे गुजरातच्या पारड्यात झुकलेला होता. मात्र रिंकू सिंग या युवा खेळाडूने शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल पाच षटकार मारत हा सामना केकेआरच्या नावावर केला हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला.
पाहा व्हिडीओ-
The monumental finish of Rinku Singh.
5 consecutive sixes to win it for KKR. pic.twitter.com/RBzUurLKu2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 9, 2023
Rinku Singh you beauty you made the impossible-possible.
More power to KKR!!!?? @rinkusingh235 #KKRvsGT #iftaartreat pic.twitter.com/YiKNKuC7ph— Mushtaq Shiekh (@shiekhspear) April 9, 2023
— Ritish Gotam (@gotam_ritish) April 9, 2023
Yash Dayal couldn’t believe what had just happened.
Rinku Singh the artist!#KKRvsGT #RinkuSingh
Take a Bow…? pic.twitter.com/EWfYIwB6QZ
— Team For Tarak (@Gani_Tarakiann) April 9, 2023
गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना केकेआरला 205 धावांचं लक्ष दिलं होतं या लक्षाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात म्हणावी अशी काही झाली नाही कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये गुरबाजला मोहम्मद शमीने बाद केलं. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या व्यंकटेश अय्यर याने सामन्याच रूप पालटून टाकलं होतं. मात्र अय्यर 83 धावांवर बाद झाला आणि राशिद खान याने हॅट्रिक घेत सामन्यात ट्विस्ट आणला. परंतु मैदानात रिंकू सिंग होता.
शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआर संघाला 29 धावांची गरज होती. गुजरात संघाकडून यश दयाळ हा गोलंदाजीसाठी आला होता तर पहिल्या चेंडूवर उमेश यादवने एक धाव घेतली रिंकू सिंग याला स्ट्राइक दिली. त्यानंतर रिंकू सिंग यादवचं वादळ आलं ते सर्वांनी पाहिलं, कारण रिंकू सिंगने त्यानंतर शेवटच्या पाच चेंडूंमध्ये 28 धावांची गरज असताना सलग पाच षटकार मारत सामना केकेआरच्या पारड्या झुकवला आणि हा विजयाचा हातात तोंडाशी आलेला घास हिसकावलाय.