मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यामध्ये गुजरात संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने दिलेल्या 198 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना शुबमन गिल याच्या शतकाच्या जोरावर आरसीबीला त्यांनी पराभवाची धूळ चारली आहे. 19.1 ओव्हरमध्ये गुजरातने हे आव्हान पूर्ण केलं आहे. गुजरातच्या विजयासह आरसीबी प्ले-ऑफमधून बाहेर झाला असून चौथ्या स्थानी मुंबई इंडिअन्स संघ असून अंतिम चारमध्ये त्यांनी समावेश केला आहे.
विराट कोहली याने 101 धावांची शतकी खेळी केली होती, या दमदार खेळीच्या जोरावर आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा काढल्या होत्या. एकवेळ अशी होती की गुजरात लक्ष्य पार करेल की नाही असं वाटत होतं. कारण सलामीला आलेला साहा तिसऱ्याच ओव्हरमध्ये बाद झाला. त्यामुळे गुजरात हा सामना गमावणार की काय असं वाटत होतं. मात्र विजय शंकर आणि शुबमन गिल या दोघांमध्ये झालेली भागीदारी सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरला.
आता गुजरात संघाच्या विजयामुळे मुंबईसाठी प्ले-ऑफची दारे खुली झाली आहे. आता प्ले-ऑफमधील चार संघही समोर आले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर किंग्ज आणि मुंबई इंडिअन्स हे अंतिम चार संघ दाखल झाले आहेत. आता गुजरात आणि चेन्नई यांच्यामधील जिंकणारा संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे. गुजरात किंवा चेन्नई यांच्यमधील ज्या संघाचा पराभव होईल त्यांचा सामना लखनऊ आणि मुंबई यांच्यातील विजयी संघासोबत असणार आहे.
विजय शंकर 53 धावांवर अर्धशतक करून बाद झालं मात्र गिल याने एक बाजू लावून धरली होती. सामना खिशात घातलाच त्यासोबत पठ्ठ्याने सिक्सर मारत यंदाच्या पर्वातील आपलं दुसरं शतकही पूर्ण केलं.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (W), हार्दिक पांड्या (C), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (W), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख