मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत गतविजेता गुजरात टायटन्स संघ चांगलाच फॉर्मात आहे. त्यात शुभमन गिलचा फॉर्म जबरदस्त आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याने दोन शतकं झळकावली आहेत. त्यामुळे या स्पर्धेत मानाचं स्थान कमवण्याची संधी आहे. साखळी फेरीत फाफ डु प्लेसिसची दमदार कामगिरी दिसली. त्याने 14 सामन्यात 56.15 च्या सरासरीने एकूण 730 धावा केल्या. यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील 84 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्यामुळेच तो डोक्यावर ऑरेंज कॅप मोठ्या मानाने मिरवत आहे. पण प्लेऑफमध्ये हा मान मिळवण्याची नामी संधी शुभमन गिलकडे आहे. कारण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शुभमन गिल दुसऱ्या स्थानी असून त्याला फक्त 50 धावांची आवश्यकता आहे.
शुभमन गिलने 14 सामन्यात 56.67 च्या सरासरीने 680 धावा केल्या आहेत. गिलने दोन शतकं आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत. त्यात प्लेऑफच्या दोन सामन्यात 50 धावा करताच फाफला मागे टाकू शकतो. गुजरात टायटन्सचा प्लेऑफमधील सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत आहे. या स्पर्धेतील विजयानंतर थेट अंतिम फेरीत स्थान मिळेल.अन्यथा पराभवानंतर मुंबई विरुद्ध लखनऊ या सामन्यातील विजेत्यासोबत लढावं लागणार आहे.
सध्या शुभमन गिलचा फॉर्म पाहता तो 50 धावा सहज करेल असं क्रिकेटप्रेमींचं म्हणणं आहे. शुभमनच्या आसपास आता कोणताच खेळाडू नाही. फाफ आणि विराटचा संघ स्पर्धेतून बाद झाला आहे. यशस्वी जयस्वालच्या राजस्थान संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. चेन्नईचा डेव्हॉन कॉनवे 585 धावांसह पाचव्या स्थानी आहे. त्याला सलग दोन शतकं ठोकणं काही शक्य नाही. त्यामुळे शुभमन गिलला नामी संधी आहे.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
पर्पल कॅपच्या शर्यतीत गुजरात टायटन्सचे दोन खेळाडू आहेत. मोहम्मद शमी आणि राशीद खानने प्रत्येकी 24 गडी बाद करत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. मोहम्मद शमीची गोलंदाजाची सरासरी चांगली असल्याने पहिल्या स्थानावर आहे. युजवेंद्र चहल 21 विकेटसह तिसऱ्या, तर मुंबई इंडियन्सचा पियुष चावला 20 विकेटसह चौथ्या स्थानावर आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.