GT vs CSK IPL 2023 : फायनलमध्ये चेन्नईला लोळवण्यासाठी पंड्या चालला ती ‘चाल’?, चेन्नईचं टेन्शन वाढलं!

| Updated on: May 28, 2023 | 7:43 PM

हार्दिक पंड्या आणि महेंद्र सिंह धोनी आपली संपूर्ण ताकद लावताना दिसतील. पंड्याने यासाठी एक मस्त कमाल चाल केली आहे.

GT vs CSK IPL 2023 : फायनलमध्ये चेन्नईला लोळवण्यासाठी पंड्या चालला ती चाल?,  चेन्नईचं टेन्शन वाढलं!
ms dhoni-Hardik pandya
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या थरारामधील शेवटचा म्हणजेच फायनल सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या सामन्यामध्ये हार्दिक पंड्या आणि महेंद्र सिंह धोनी आपली संपूर्ण ताकद लावताना दिसतील. या सामन्यामध्ये गुजरातचा कर्णधार हार्दिकने दुसऱ्यांदा ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी संघात काहीसा बदल करणार असल्याची माहिती समजत आहे.

सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये गुजरातची सलामीची जोडी शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी कमाल केली होती. मात्र गेल्या दोन ते चार सामन्यांमध्ये साहा खास काही करू शकला नाही. यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या फलंदाजीचा क्रमही बदलला जाऊ शकतो, कारण अलीकडच्या सामन्यांमध्ये तो सलामीला फारशी कामगिरी करू शकला नाही.  त्यामुळे आता वृद्धिमान साहाच्या जागेवर एक स्पोटक फलंदाज उतरलेला दिसू शकतो.

हा खेळाडू दुसर तिसरा कोणी नसून डेव्हिड मिलर असू शकतो. मिलर सध्या एकदम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. डेव्हिड मिलर हा टी-20 फॉरमॅटमध्ये अतिशय धोकादायक फलंदाज आहे. डेव्हिड मिलरने 120 आयपीएल सामन्यांमध्ये 36.19 च्या सरासरीने 2714 धावा केल्या आहेत ज्यात 1 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात, गुजरात टायटन्सचा संघ धोकादायक डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलर शुभमन गिलसह सलामीसाठी मैदानात उतरेल. अशा स्थितीत गुजरात टायटन्सच्या संघाला डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजाची सलामीची जोडी मिळेल. डाव्या हाताचे सलामीवीर हे कोणत्याही संघासाठी एक्स फॅक्टर ठरतात.

डेव्हिड मिलरकडे टी-20 क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. डेव्हिड मिलरचा आयपीएलमध्ये 138.4 स्ट्राईक रेट आहे. डेव्हिड मिलर हा अतिशय धोकादायक फलंदाज असून तो क्रीझवर येताच सामना पलटवण्याची ताकद तो ठेवतो.