मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेच्या प्लेऑफचं चित्र अजूनही स्पष्ट नाही. कारण साखळी फेरीतील दररोज होणारे सामने चित्र बदलत आहेत. कधी हा संघ अव्वल, तर तो संघ असं काहीसं चित्र आहे. एकाच संघाचं वर्चस्व या स्पर्धेत तरी नाही. त्यामुळे कोणता संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळेल हे अजूनसही स्पष्ट नाही. आतापर्यंत एकूण 46 सामने झाले असून सात संघांमध्ये प्लेऑफसाठी जबरदस्त चुरस आहे. पण हा सर्व गुंता असताना माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने प्लेऑफबाबत भाकीत केलं आहे. त्याचं भाकीत ऐकून भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ टॉप 4 मध्ये आहेत.
आयपीएल दरम्यान समालोचन करणाऱ्या हरजभजन सिंगने दावा केला आहे की, प्लेऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचतील हे सांगणं कठीण आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवतील. या व्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स टॉप 4 मध्ये असतील.
हरभजन सिंगने पुढे सांगितलं की, “राजस्थानचा संघ स्पर्धेत चांगला खेळत आहे. पण कोणतातरी संघ नक्कीच त्यांना मागे टाकेल. माझ्या मते मुंबई इंडियन्स त्यांना पाठी टाकेल.”
राजस्थान रॉयल्सचा बॉलिंग अटॅक सर्वात जबरदस्त आहे. राजस्थान रॉयल्सने स्पर्धेत आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. राजस्थानने 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स टॉप 4 मध्ये नसेल असं भाकीत जरा आश्चर्यकारक वाटतं.
लखनऊ सुपर जायंट्स हा संघही चांगली कामगिरी करत आहे. संघ 11 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. लखनऊने उर्वरित सामन्यात सुमार कामगिरी केली तरच संघ टॉप 4 मधून बाहेर पडू शकतो. त्यामुळे हरभजन सिंगची भाकित किती बरोबर ठरतं ते येणारा काळच ठरवेल.
दुसरीकडे, कोलकाता नाइट रायडर्स, रानराईजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे उर्वरित सामने औपचारिकता असेल असंच म्हणावं लागेल.
राजस्थानचा पूर्ण स्क्वॉड : संजू सॅमसन, यशस्वी जायसवाल, शिमरन हेटमायर, दीपक पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा, जेसन होल्डर, जेसन होल्डर, एडम झम्पा, जो रूट, डोनोवन फरेरा, केएस आसिफ,अब्दुल पीए, आकाश वशिष्ट,कुणाल राठौर आणि मुरुगन अश्विन.
लखनऊचा पूर्ण स्क्वॉड : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पंड्या, कायल मायर्स, मार्कस स्टोयनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, जयदेव उनादकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सैम्स, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युद्धवीर सिंह.