मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 63 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. प्लेऑफच्या दृष्टीकोनातून दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्स 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स 13 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. लखनऊच्या होमग्राउंडवर हा सामना होत आहे. त्यात आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स दोन वेळा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यात लखनऊने बाजी मारली आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. हा सामना मुंबई इंडियन्सने गमावला तर प्लेऑफचं गणित कसं असेल समजून घ्या.
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही संघांचा प्रत्येकी एक सामना उरणार आहे. त्यामुळे दोन गुणांची कमाई प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या सामन्यावर बंगळुरु, राजस्थान, कोलकाता आणि पंजाबला एक संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्सचा लखनऊनंतर शेवटचा सामना सनराईजर्स हैदराबादसोबत आहे.
प्लेऑफमध्ये पहिलं आणि दुसरं स्थान खूपच महत्त्वाचं असतं. कारण एक सामना गमावला तरी दुसरी संधी मिळते. त्यामुळे प्लेऑफच्या दृष्टीने हे स्थान खूपच महत्त्वाचं आहे. मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत केलं तर दुसऱ्या स्थानी पोहोचणार आहे. कारण मुंबईचे 16 गुण आहेत. चेन्नईचे 15 गुण आहेत. चेन्नईने दिल्ली विरुद्धचा शेवटचा सामना गमावला तर मात्र मुंबईच दुसऱ्या स्थानी राहील. त्यामुळे प्लेऑफमध्ये दोन संधी मिळतील.
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.