मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत 2-1 ने पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा 5 विकेट्स जिंकत 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने 1-1 ने मालिकेत बरोबरी साधली. यामुळे तिसरा सामना हा निर्णायक होणार असल्याचं स्पष्ट झालं. या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळाली. मात्र अखेरीस ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करुन मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. या मालिका पराभवासह टीम इंडियाला एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थानही गमवावं लागलं. यामुळे टीम इंडियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. आता या मालिकेनंतर सर्व खेळाडू हे आयपीएलच्या 16 व्या मोसमाच्या तयारीला लागले आहेत.
आयपीएलच्या 16 व्या मोसमाला 31 मार्चपासून सुरुवात होत आहेत. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या टीमची प्रत्येकी 2 गटात विभागणी करण्यात आली आहे.या 16 व्या पर्वासाठी प्रत्येक टीम तयारीला लागला आहे. प्रत्येक संघ जोरदार सराव करत आहे. टीम इंडियातून बाहेर असलेला युवा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संजू राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. राजस्थानने जयपूरमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये सराव शिबिराला सुरुवात झाली आहे. यामध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक खेळाडू दाबून मेहनत करतोय.शिवाय कॅप्टन संजूही घाम गाळतोय.
राजस्थान रॉयल्सने इंस्टाग्रावर एक रील शेअर केला आहे. यामध्ये संजू सॅमसन प्रॅक्टीस करताना दिसतोय. संजू षटकार ठोकतोय. या रिलमध्ये जसा फटका मारतोय कावळे घाबरुन हेत उडत आहे. तसेच या व्हीडिओत संजूची फटकेबाजी पाहत आहेत.
राजस्थान रॉयल्स टीम | संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, रियान पराग, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा, जेसन होल्डर, डोनोवन फरेरा (विकेटकीपर), कुणाल राठौर, एडम ज़म्पा, केएम आसिफ, मुरुगन अश्विन, आकाश वशिष्ठ, अब्दुल पीए आणि जो रूट.