मुंबई : आयपीएल 2023 च्या हंगामाला सुरू होण्यासाठी चार दिवस बाकी असताना मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेअस अय्यर दुखापती असल्याने त्याच्या जागी कोलकाता संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी नितीश राणाकडे सोपवण्यात आली आहे. श्रेयस अय्यर याला दोनवेळा दुखापतीमुळे कर्णधआरपद गमवावं लागलं आहे. मात्र केकेआरच्या या निर्णयाने सर्वांना चकित केलं आहे.
Kaptaan – ?? ??? ??? ??????? ???. Action begins, 1st April 2023 ??@NitishRana_27 #AmiKKR #KKR #TATAIPL2023 pic.twitter.com/q6ofcO2WGG
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 27, 2023
शाहरुख खानची टीम आंद्रे रसेल, सुनील नरेन किंवा टिम साऊदी यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी जाईल असं बोललं जात होतं. मात्र श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत केकेआरच्या व्यवस्थापनाने नितीश राणावर विश्वास ठेवला आहे. केकेआरने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
नितीशने 11 मे 2016 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध आयपीएलमधील पहिला सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत 91 सामने खेळले असून 27.96 च्या सरासरीने 2,181 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 134.22 आहे. आपल्या आयपीएल कारकिर्दीतमध्ये त्याने आतापर्यंत 15 अर्धशतकांसह 190 चौकार आणि 111 षटकार मारले आहेत. आयपीएलमधील त्याची सर्वाधिक धावसंख्या 87 धावा आहे.
कोलकाता नाईट रायडर्स अंतिम संघ:
श्रेयस अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, नारायण जगदीश, अरविंद अरविंद, वरुण चक्रवर्ती. , सुयश शर्मा, डेव्हिड वाईज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, लिटन दास, शाकिब अल हसन.