मुंबई | आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात ही येत्या 31 मार्चपासून होत आहे. या पर्वातील सलामीचा सामना हा गतविजेत्या गुजरात विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या पर्वासाठी सर्व संघानी सरावाला सुरुवात केली आहे. मात्र त्याआधी एका टीमच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलंय. त्यामुळे या टीम मॅनेजमेंटच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
दुखापतीमुळे टीमचा कॅप्टन या संपूर्ण मोसमातून बाहेर झाला आहे. त्यानंतर एक खेळाडू हा दुखापतीच्या कचाट्यात आधीच अडकलाय. त्यातच 2 खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट बोर्डाने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगीचं पत्र दिलेलं नाही. ही सर्व डोकेदुखी कमी की काय, त्यात आता दुप्पटीने भर पडलीय. आता ओपनिंग बॅट्समनची भर पडलीय.
धक्कादायक बाब म्हणजे एका आठवड्यात तब्बल 3 खेळाडू हे दुखापतग्रस्त झालेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलंय. आधी कॅप्टन श्रेयस अय्यर याला बॅक इंजरीमुळे तो बाहेर पडलाय. यानंतर न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन यालाही हॅमस्ट्रिंग दुखापत झालीय. तर आता ओपनर बॅट्समन नितीश राणा याला देखील दुखापत झालीय.
इनसाईड स्पोर्ट्सनुसार, नितीश राणा याला सरावादरम्यान ईडन गार्डनमध्ये दुखापत झाली. त्यामुळे केकेआर टेन्शनमध्ये आहे. सरावादरम्यान नितीशला पायाच्या टाचेला बॉल लागला. त्यामुळे नितीशला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर नितीश जमीनीवर पडून राहिला. त्यानंतर नितीश उठून मैदानातील दुसऱ्या बाजूला निघून गेला. मात्र आता नितीशला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे अजून निश्चित नाही.
दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केकेआर मॅनेजमेंटला झटका दिलाय. कोणत्याही लीग स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडूंना आपल्या क्रिकेट बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बॅट्समन लिटॉन दास आणि ऑलराउंडर शाकिब अल हसन यांना परवानगी नाकारली. त्यामुळे केकेआरला असाही झटका बसलाय.
कोलकाता नाईट रायडर्स टीम | श्रेयस अय्यर, रहमनुल्लाह गुरबाज, रिंकू सिंह, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, सुनील नरेन, नीतीश राणा, टीम साउथी, लॉकी फर्गुसन, वेंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, शाकिब अल हसन, डेविड वीजा, एन जगदीशन, वैभव अरोरा, मंदीप सिंह, लिट्टॉन दास, कुलवंत खेजरोलिया आणि सुयश शर्मा.