Ajinkya Rahane | महेंद्रसिंह धोनी याचं ऐकाल तर….., सनसनाटी खेळीनंतर रहाणे नक्की काय म्हणाला?

| Updated on: Apr 24, 2023 | 11:28 PM

अजिंक्य रहाणे याने चेन्नई सुपर किंग्सकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध धमाकेदार कामगिरी केली. रहाणेने चेन्नईच्या विजयानंतर महेंद्रसिंह धोनी याच्याबाबत मोठी वक्तव्य केलं आहे.

Ajinkya Rahane | महेंद्रसिंह धोनी याचं ऐकाल तर....., सनसनाटी खेळीनंतर रहाणे नक्की काय म्हणाला?
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याचा नवा अंदाज क्रिकेट चाहत्यांना रविवारी 23 एप्रिलला पाहायला मिळाला. अजिंक्य रहाणे याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध वादळी विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. रहाणेने या खेळीदरम्यान एबी डी व्हीलियर्स याच्यासारखे मैदानात उलटसुलट फटके मारले. रहाणेने फक्त 29 बॉलमध्ये 71 धावा ठोकल्या. रहाणेचं हे या मोसमातील दुसरं अर्धशतक ठरलं. रहाणेने अवघ्या 29 बॉलमध्ये 6 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने नाबाद 71 धावा केल्या. विशेष बाब म्हणजे रहाणेने फक्तत 6 चौकार आणि 5 सिक्स म्हणजे 11 बॉलमध्ये खडेखडे 54 धावा केल्या. रहाणेचा असा अंदाज क्रिकेट चाहत्यांना नक्कीच पाहायला मिळाला नसेल . चेन्नईच्या विजयानंतर रहाणेने कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याच्याबाबत फार काही बोलला. रहाणे धोनीबाबत जे बोलला ते सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

रहाणेने महेंद्रसिंह धोनी याच्या रणनितीचं कौतुक केलं. “महेंद्रसिंह धोनीन याने सांगितलेलं ऐकलं आणि त्यावर अंमलबजावणी केली तर, जगात काहीही मिळवलं जाऊ शकतं”, असं रहाणे धोनीबाबत म्हणाला. धोनीच्या नेतृत्वात असंख्य गोष्टी शिकायला मिळतात, असं रहाणेने म्हटलं. रहाणे टीम इंडियात महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात अनेक वर्ष खेळला आहे. तर रहाणेची यंदा आयपीएलमध्ये धोनीच्या कॅप्टन्सीत खेळण्याची पहिलीच वेळ आहे.

“धोनी जेव्हा तुम्हाला काही सांगतो आणि तुम्ही ऐकता, त्यानंतर तुम्ही काहीही प्राप्त करु शकता. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये खेळणं सोपं नाही” असं रहाणे म्हणाला. चेन्नई सुपर किंग्सने ट्विटरवर रहाणेचा धोनीबाबत बोलतानाचा व्हीडिओ पोस्ट केला आहे.

रहाणे धोनीबाबात काय म्हणाला?

“बॅटिंग करताना फार मजा आली. मी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत होतो, कारण तेव्हा टीमची स्थिती तशी होती. सर्व फलंदाजांना आपली भूमिका बजावायची होती”, असं रहाणे याने स्पष्ट केलं. तसंच रहाणेने ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे आणि शिवम दुबे या तिकडीचं कौतुक केलं. केकेआर विरुद्ध ऋतुराजने चेन्नईला चांगली सुरुवात देण्यात भूमिका बजावली. तर डेव्हॉन कॉनवे आणि शिवम दुबे या दोघांनी अर्धशतकी खेळी केली.