Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याची तुफानी खेळी, केकेआर विरुद्ध विस्फोटक बॅटिंग

| Updated on: Apr 23, 2023 | 10:05 PM

अजिंक्य रहाणे याने चेन्नई सुपर किंग्सकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध जोरदार आणि विस्फोटक फटकेबाजी केली. रहाणेने शानदार अर्धशतक ठोकत अखेरपर्यंत नाबाज खेळी केली.

Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याची तुफानी खेळी, केकेआर विरुद्ध विस्फोटक बॅटिंग
Follow us on

कोलकाता | आयपीएल 16 व्या मोसमातील 33 वा सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. कोलकाताने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईने मिळालेल्या बॅटिंगच्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 4 विकट्स गमावून तब्बल 235 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने 35 धावांची खेळी केली. तर डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे या तिघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. कॉनवे याने 56 आणि शिवम दुबे याने 50 धावा केल्या. तर वनडाऊन आलेल्या अजिंक्य रहाणे याने शेवटपर्यंत नाबाद आणि चेन्नईकडून सर्वाधिक 71 रन्स केल्या. रहाणे याने केकेआर विरुद्ध मैदानात चौफेर फटकेबाजी केली.

रहाणेने आपल्या या खेळीदरम्यान काही हटके शॉट मारले. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात रहाणेचं नवं रुप पाहायला मिळालं. रहाणेने अवघ्या 29 बॉलमध्ये 6 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने नाबाद 71 धावा केल्या. विशेष बाब म्हणजे रहाणेने फक्तत 6 चौकार आणि 5 सिक्स म्हणजे 11 बॉलमध्ये खडेखडे 54 धावा केल्या.

अजिंक्य रहाणे याचा नवा अंदाज

याव्यतिरिक्त चेन्नईकडून रविंद्र जडेजा याने 18 तर धोनीने नाबाद 2 धावा केल्या. केकेआरकडून कुलवंत खेजोलिया याने 2 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्थी आणि सुयश शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान चेन्नईने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 4 मॅचमध्ये विजय मिळवलाय. तर केकेआरने 6 मधून फक्त 2 सामने जिंकले आहेत. चेन्नई ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स 4 पॉइंट्ससह आठव्या स्थानी विराजमान आहे.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तिक्षाना.