कोलकाता | आयपीएल 16 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. आतापर्यंत प्रत्येक टीमने किमान 6-7 सामने खेळले आहेत. क्रिकेट चाहत्यांना दिवसेंदिवस रंगतदार, थरारक आणि बीपी वाढवणारे सामने पाहायला मिळतायेत. त्यामुळे चाहत्यांचंही भरभरुन मनोरंजन होतंय. या 16 व्या हंगामातील 33 वा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. हा सामना कोलकातामधील इडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा आणि चेन्नई सुपर किंग्स टीमचा स्टार ऑलराउंडर ऋतुराज गायकवाड याला ऑन कॅमेरा धमकी देण्यात आली आहे. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ऋतुराज गायकवाड याने कोलकाता विरुद्ध डेव्हॉन कॉनवे याच्यासोबत चेन्नईला शानदार सुरुवात मिळवून दिली. डेव्हॉन आणि ऋतुराज या दोघांनी पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये फटकेबाजी करत आश्वासक सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी सलामी अर्धशतकी भागीदार केली. यानंतरही ऋतुराज आणि डेव्हॉन दोघेही शानदार पद्धतीने खेळत होते. केकेआर विकेटच्या शोधात होती. यामुळे केकेआर कॅप्टन नितीश राणा याने सुयश शर्मा याला चेन्नईच्या डावातील 8 वी ओव्हर टाकायला दिली.
सुयश शर्मा याने कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवा. जितेश शर्मा याने केकेआरला ब्रेक थ्रू मिळवून दिला. सुयशने डेव्हॉन आणि ऋतुराज ही सेट झालेली सलामी जोडी फोडली. सुयशने ऋतुराजला डोळ्यांसमोर क्लिन बोल्ड केलं. ऋतुराजने 20 बॉलमध्ये 3 सिक्स 2 चौकारांच्या मदतीने 35 धावांची खेळी केली.
सुयश शर्मा याने ब्रेक थ्रू मिळून दिल्याने मैदानात विकेटचं सेलेब्रेशन केलं. सुयशने या दरम्यान स्वत:च्या उजव्या बाजूला टीमच्या लोगो दाखवलं. त्यानंतर सुयशने ऋतुराजकडे पाहत हातात बंदूक धरल्यासारखी एक्शन केली.दरम्यान हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
सुयश शर्मा याचं विकेट सेलिब्रेशन
Cleaned up!
Suyash Sharma produces a special delivery to get Ruturaj Gaikwad out!
Follow the match ▶️ https://t.co/j56FWB88GA #TATAIPL | #KKRvCSK pic.twitter.com/8cZ64Wxq11
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2023
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तिक्षाना