IPL 2023 LSG | लखनऊ सुपर जायंट्सचा प्लेऑफआधी मोठा बदल

| Updated on: May 18, 2023 | 6:22 PM

लखनऊ सुपर जायंट्स टीमला प्लेऑफसाठी क्वालिफाय होण्यासाठी आपल्या शेवटच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं गरजेचं आहे.

IPL 2023 LSG | लखनऊ सुपर जायंट्सचा प्लेऑफआधी मोठा बदल
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आममनेसामने आहेत. या सामन्याचं संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबाद आणि आरसीबी या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. हैदराबाद आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीसाठी प्लेऑफच्या गणिताने हा सामना अतिशय असा महत्तावाचा असणार आहे. आरसीबीचा पराभव झाल्यास, टीमचं आव्हान संपुष्टात येईल. थोडक्यात काय, आता प्रत्येक टीम साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना खेळणार आहे.

लखनऊने गेल्या सामन्यात घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या विजयासह लखनऊने प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. आत लखनऊ 20 तारखेला केकेआर विरुद्ध साखळी फेरीतील अंतिम सामना खेळणार आहे. त्याआधी लखनऊने मोठा निर्णय घेतला आहे. लखनऊ टीममध्ये मोठा बदल होणार आहे.

लखनऊ विरुद्ध केकेआर हा सामना कोलकातमधील इडन गार्डनमध्ये होणार आहे. लखनऊच्या टीममध्ये हा बदल नाही. लखनऊ टीम कोलकाताच्या फुटबॉल क्लब मोहन बागानला सन्मानित करणार आहेत. या सामन्यात लखनऊ मोहन बागान टीमची जर्सी परिधान करणार आहेत. या सामन्याआधी लखनऊच्या खेळाडूंनी या नव्या जर्सीमध्ये फोटोशूटही केलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सने हे फोटो ट्विट केले आहेत.

लखनऊ टीमचा नवा लूक

लखनऊला गरज एका विजयाची

दरम्यान लखनऊला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. लखनऊने गेल्या सामन्यात मुंबईवर शेवटच्या ओव्हरमध्ये 5 धावांनी विजय मिळवला होता. लखनऊने केकेआरला पराभूत केल्यास 17 पॉइंट्स होतील. त्यामुळे लखनऊ कोणत्याही स्थितीत प्लेऑफसाठी पात्र ठरेल. मात्र लखनऊने हा सामना गमावला, तर दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर भवितव्य ठरेल.

लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान कायल मेयर्स, यश ठाकूर, कृष्णाप्पा गोतम, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग चरक, अमित मिश्रा, आवेश खान, अर्पित गुलेरिया, करुण नायर, मनन वोहरा, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड आणि करण शर्मा.