IPL 2023 : KKR vs RCB | केकेआरला ‘या’ विश्वासू खेळाडूनेच दिला धोका, 12 कोटी लावले अन् तो एक बॉल खेळून आऊट!

| Updated on: Apr 07, 2023 | 4:49 PM

केकेआरने आरसीबीचा 81 धावांनी पराभव केला. सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय म्हणावा लागेल, कारण आरीसीबीच्या प्रमुख फलंदाजांना केकेआरच्या फिरकीपटूंनी चारीमुंड्या चीत केलं. मात्र एका खेळाडूने वेळेलाच नांगी टाकली.

IPL 2023 : KKR vs RCB | केकेआरला या  विश्वासू खेळाडूनेच दिला धोका, 12 कोटी लावले अन् तो एक बॉल खेळून आऊट!
Follow us on

मुंबई : ईडन गार्डनवर गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात कोलकाताने विजय मिळवला. शार्दुल ठाकुरने दमदार खेळी करत संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. केकेआरने आरसीबीचा 81 धावांनी पराभव केला. सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय म्हणावा लागेल, कारण आरीसीबीच्या प्रमुख फलंदाजांना केकेआरच्या फिरकीपटूंनी चारीमुंड्या चीत केलं. केकेआरने विजय मिळवला खरा पण त्यांच्याच एका विश्वासू खेळाडूने मोक्याच्या वेळी टांग दिली.

केकेआरची अवस्था खराब झाली होता, आरसीबीच्या गोलंदाजांनी केकेआरचा बॅटींग लाईन अप उद्ध्वस्त केला होता. त्यामुळे संघाला एकच आशा राहिली होती ती म्हणजे आंद्रे रसेल. कारण संघाला 200 पेक्षा जास्त धावा करायच्या असतील तर त्यावेळी आंद्रेची बॅटींग खूप महत्त्वाची होती. मात्र त्याला काही साजेशी कामगिरी सोडा पण खातंही उघडता आलं नाही. कर्ण शर्माच्या पहिल्याच चेंडूवर तो कॅच आऊट झाला.

रसेल बाद झाल्यावर केकआर संघाची अवस्था 5 विकेट्स 89 झाली होती. मात्र शार्दुल ठाकुर आणि रिंकू सिंगने केलेल्या खेळीच्या जोरावर केकेआरने 200 धावांचा डोंगर उभा केला. केकेआर संघाने रसेलला 12 कोटी रुपये खर्च करून रिटेन केलं होतं. मात्र त्याला आपल्या ताकदीचा वापर करता आला नाही. रसेलने याआधी अनेकनवेळा केकेआरला अशा अडचणीच्या परिस्थितीतून संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे केकेआर संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 204 धावांचा डोंगर उभा केला होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ 123 धावांवर ऑल आऊट झाला. शार्दुलने 29 चेंडूत 68 धावा केल्या आणि 1 विकेट मिळवली. या प्रदर्शानाच्या जोरावर त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.