Shardul Thakur | शार्दुल ठाकूर याचा अर्धशतकासह मोठा रेकॉर्ड

| Updated on: Apr 06, 2023 | 10:23 PM

कोलकाता नाईट रायडर्सने झटपट विकेट्स गमावल्या. आरसीबीने केकेआरला बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र शार्दुल ठाकूर याने फटकेबाजी करत मोठ्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.

Shardul Thakur | शार्दुल ठाकूर याचा अर्धशतकासह मोठा रेकॉर्ड
शार्दुलने 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. शार्दुल यासह आयपीएलच्या 16 व्या मोसमात संयुक्तपणे वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलर याने सनराजयर्स हैदराबाद विरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
Follow us on

कोलकाता | आयपीएल 16 व्या मोसमातील नवव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. आरसीबीने या सामन्यात टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कोलकाताची निराशाजनक सुरुवात झाली. आरसीबीच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने केकेआरला झटके दिले. विशेष बाब म्हणजे केकेआरने 2 वेळा एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्या. मात्र यानंतर शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह या जोडीने तुफान फटकेबाजी करत केकेआरचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 103 धावांची भागीदारी केली. यादरम्यान शार्दुल ठाकूर याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकासह शार्दुलने मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शार्दुलन मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

शार्दुलने 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. शार्दुल यासह आयपीएलच्या 16 व्या मोसमात संयुक्तपणे वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलर याने सनराजयर्स हैदराबाद विरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.

हे सुद्धा वाचा

शार्दुल ठाकूरची खेळी

शार्दुलने 29 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह 68 धावांची वादळी खेळी केली. शार्दुलचं आयपीएलमधील हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. तसेच शार्दुलची ही आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

शार्दूल ठाकूर याचा रेकॉर्ड

दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 1 बदल केला आहे. आरसीबीने रीस टोपली याच्या जागी डेव्हिड विली याला संधी दिली आहे. तर केकेआरने अनूकुल सिंग याच्या जागी सुयश शर्मा याचा समावेश केला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार) रहमनुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, व्येंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊथी आणि वरुण चक्रवर्ती.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.