IPL 2023 : KKR vs RCB | नारायणsssनारायण, विराट कोहली याला नरेनने केलं चारीमुंड्या चीत, पाहा Video

| Updated on: Apr 06, 2023 | 10:40 PM

केकेआरचं ब्रह्मास्त्र असलेल्या नारायण अस्त्राने विराट कोहलीला आऊट करत आरसीबीच्या बॅटींगला सुरूंग लावला. सुनील नरेन याने विराट कोहलीला आयपीएलच्या इतिहासामध्ये चौथ्यांदा आऊट केलं आहे.

IPL 2023 : KKR vs RCB | नारायणsssनारायण, विराट कोहली याला नरेनने केलं चारीमुंड्या चीत, पाहा Video
Follow us on

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये केकेआरने 205 धावांचं आव्हान आरसीबीला दिलं आहे. शार्दुल ठाकुर याने केलेल्या 68 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर केकेआरने दोनशेचा पल्ला पार केला. आरसीबीचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने दमदार सुरूवात केली होती. मात्र केकेआरचं ब्रह्मास्त्र असलेल्या नारायण अस्त्राने विराट कोहलीला आऊट करत आरसीबीच्या बॅटींगला सुरूंग लावला. सुनील नरेन याने विराट कोहलीला आयपीएलच्या इतिहासामध्ये चौथ्यांदा आऊट केलं आहे.

विराट आण फाफने केकेआरवर आक्रमण करायला सुरूवात केली होती. त्यानंतर नितीश राणाने चेंडू अनुभवी खेळाडू सुनील नरेनकडे सोपवला. पॉवर प्लेच्या पाचव्या ओव्हरमधील पाचव्याच चेंडूवर विराटला नरेनने आपल्या जाळ्यात अडकवलं आणि सामना केकेआरच्या बाजुने झुकवला.

पाहा व्हिडीओ –

 

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आरसीबी प्लेइंग इलेव्हन – फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन- नितीश राणा (कर्णधार) रहमनुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, व्येंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊथी आणि वरुण चक्रवर्ती