पश्चिम बंगाल | राजस्थान रॉयल्स टीमचा युवा आणि छावा बॅट्समन यशस्वी जयस्वाल याने पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगने धमाका केलाय. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 150 धावांच्या पाठलाग करायला उतरलेल्या राजस्थानच्या या बॅट्समनने कीर्तीमान रचला आहे. यशस्वीने आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यशस्वीने अवघ्या 13 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं आणि केएल राहुल याचा रेकॉर्ड केला आहे. यशस्वीने या 13 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 चौकार ठोकले. याचाच अर्थ असा की यशस्वीने या अर्धशतकातल्या 50 पैकी 46 धावा या खडेखडे केल्या. तर उर्वरित 4 धावा धावून घेतल्या.
यशस्वीने केएल राहुल याला मागे टाकलंय. याआधी वेगवान अर्धशतकाचा विक्रम हा केएल याच्या नावावर होता. केएल याने 8 एप्रिल 2018 रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध हा कारमाना केला होता. तेव्हा केएल पंजाब इलेव्हनकडून खेळायचा. तर आता केएल आता लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. मात्र केएल याला दुखापत झाल्याने तो या 16 व्या मोसमातून बाहेर झाला आहे.
आयपीएल इतिहासातील वेगवान अर्धशतक
Fastest FIFTY in the IPL
Yashasvi Jaiswal brings up his half-century in just 13 deliveries ??#TATAIPL #KKRvRR pic.twitter.com/KXGhtAP2iy
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
दरम्यान केकेआरने राजस्थानला विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलंय. राजस्थान कॅप्टन संजू समॅनस याने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानच्या गोलंदाजांनी आपल्या कॅप्टनचा निर्णय अचूक ठरवला. राजस्थानच्या गोलंदाजांनी केकेआरला ठराविक अंतराने झटके देणं सुरुच ठेवलं होतं. केकेआरच्या फलंदाजांना राजस्थानच्या भेदक माऱ्यासमोर 8 विकेट्स गमावून 20 ओव्हमध्ये 149 धावाच करता आल्या. राजस्थानकडून युझवेंद्र चहल याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. चहलने यासह पर्पल कॅप मिळवली. तसेच चहल ड्वेन ब्राव्हो याचा रेकॉर्ड ब्रेक करत आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.