कोलकाता | आयपीएल 16 व्या मोसमाातील 19 वा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात हैदराबादने बॅटिंग करताना कोलकाताला विजयासाठी 229 धावांचं तगडं आव्हान दिलंय. केकेआरकडून गुजरात टायटन्स विरुद्धच्या मागील सामन्यात रिंकू सिंह याने एका ओव्हरमध्ये 5 सिक्स ठोकत टीमला विजय मिळवून दिला होता. आता हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात केकेआरचा कॅप्टन नितीश राणा याने तशीच कामगिरी केलीय. नितीश राणा याने एकाच ओव्हरमध्ये 4 चौकार आणि 2 सिक्स ठोकत 28 धावा कुटल्या आहेत.
जम्मू एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हैदराबादचा गोलंदाज कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील सहावी ओव्हर टाकायला आला. नितीश राणा मोठे शॉट मारण्याची संधीच शोधत होता. उमरान मलिकच्या बॉलिंगवर नितीशने पहिल्याच बॉलपासून दे दणादण फटके मारायला सुरुवात केली. नितीशने या ओव्हरमध्ये दुसऱ्या आणि सहाव्या बॉलवर सिक्स ठोकला. तर बाकी बॉलवर चौकार ठोकले. विशेष म्हणजे नितीशने या खेळीदरम्यान आयपीएलमधील 200 चौकार पूर्ण करत अनोखं द्विशतकही पूर्ण केलं.
एकाच ओव्हरमध्ये 28 धावा
4⃣6⃣4⃣4⃣4⃣6⃣@NitishRana_27, amader skipper! ? https://t.co/K7k8MaGCxw
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 14, 2023
दरम्यान त्याआधी केकेआरने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 228 धावा केल्या. हैदराबादकडून मयंक अग्रवाल याने 9 धावा केल्या. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर वरुण चक्रवर्थीने त्याचा झेल घेतला. राहुल त्रिपाठीही काही खास करू शकला नाही. त्रिपाठी यानेही 9 रन्स केल्या. त्यानंतर ब्रूक आणि कॅप्टन एडन मार्करम याने हैदराबादचा डाव सावरला.
मार्करमने आक्रमक फटकेबाजी करत 50 धावा ठोकल्या. पण मार्करम फटकेबाजीच्या नादात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर कॅच आऊट झाला. मार्करम याने 50 धावा केल्या. अभिषेक शर्माने मैदानात येत आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याने 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रूक्सन मोर्चा सांभाळला आणि शतकी खेळी केली. त्याने 55 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्थीने 1 विकेट घेतली.
कोलकाता नाइट राइडर्स | नीतीश राणा (कर्णधार), राहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, एन जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्यूसन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.
सनराइजर्स हैदराबाद | एडेन मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासन, अभिषेक शर्मा, मार्को जानेसन, मयंक मार्कंडेय, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक.