कोलकाता | कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या होम ग्राउंड इडन गार्डनवर आयपीएल 16 व्या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. कोलकाताने आरसीबीवर 81 धावांनी मात केली आहे. कोलतातने आरसीबीला विजयासाठी 205 धावाचं मजबूत आव्हान दिलं होतं. मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी आरसीबीला 123 धावांवर ऑलआऊट केलं. आरसीबीचा हा या हंगामातील पहिला पराभव ठरला. आरसीबीरकडून फॅफ डु प्लेसिस याने सर्वाधिक 23 रन्स केल्या. विराटने 21 धावा जोडल्या. डेव्हिड व्हिली याने नाबाद 20 धावा केल्या. मायकल ब्रेसवेल याने 19 रन्सचं योगदान दिलं. आकाश दीपने 17 रन्स केल्या केकेआरकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सुयश शर्मा याने 3 विकेट्स घेतल्या. सुनील नरेन याने 2 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शार्दुल ठाकूरने 1 विकेट घेतली.
KKR Spinners ?#IPL2023#KKRvRCB pic.twitter.com/srBLOwuKom
— RVCJ Media (@RVCJ_FB) April 6, 2023
कोलकाताने आरसीबीला ऑलआऊट केलं. या 10 पैकी 9 विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. यासह कोलकाताच्या गोलंदाजांनी इतिहास रचला. आयपीएलच्या कोणत्याही एका सामन्यात फिरकी गोलंदाजांनी 9 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यामध्ये वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मात्र सुनील नरेन आणि सुयश शर्मा या दोघांनीही दुसऱ्या बाजूने विकेट घेत आरसीबीला बॅक फूटवर ढकलण्याचं काम केलं.
दरम्यान त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. कोलकाताकडून शार्दुल ठाकूर याने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. ओपनर रहमनुल्लाह गुरुबाज याने 57 रन्सची खेळी केली. तर रिंकू सिंह याने 46 रन्सचं योगदान दिलं.
शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 103 रन्सची पार्टनरशीप केली. हीच शतकी भागीदारी ही निर्णायक ठरली. या भागीदारीमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. या दोघांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावरच आरसीबीला विजयासाठी 205 धावांचं डोंगराएवढं आव्हान देता आलं. रसीबीकडून कर्ण शर्मा आणि डेव्हिज विली या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि ब्रेसवल या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार) रहमनुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, व्येंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊथी आणि वरुण चक्रवर्ती.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.