“मरण्याआधी मला..”, धोनीची ऑटोग्राफ दाखवत सुनील गावसकर भावूक, पाहा व्हीडिओ

| Updated on: May 16, 2023 | 3:47 PM

Sunil Gavskar On Dhoni | दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी महेंद्रसिंह धोनी याच्याकडून ऑटोग्राफ घेतल्याने सर्वांची मनं जिंकली. गावसकर यांनी आता मरण्याधी त्यांच्या 2 अखेरच्या इच्छा काय आहे, हे सांगितलंय.

मरण्याआधी मला.., धोनीची ऑटोग्राफ दाखवत सुनील गावसकर भावूक, पाहा व्हीडिओ
Follow us on

मुंबई | टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर सध्या आयपीएल 16 व्या मोसमात समालोचकाची भूमिका पार पाडत आहेत. रविवारी 14 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. चेन्नईचा हा एम ए चिदंबरम स्टेडियमवरील घरच्या मैदानातील अखेरचा सामना होता. या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नईच्या चाहत्यांनी मैदानाला फेरा मारत चाहत्यांचे आभार मानले. यावेळेस गावसकर यांनी धोनीकडून आपल्या शर्टावर ऑटोग्राफ मागितला. त्या दिवसापासून ते आतापर्यंत त्या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

गावसकर ऑटोग्राफ घेण्यासाठी एका लहान मुलासारखे धोनीच्या दिशेने धावत गेले होते. त्यानंतर कॅमेरामॅनकडून मार्कर घेत धोनीचा ऑटोग्राफ घेतला होता. गावसकर यांनी आपल्या त्या कृतीने असंख्य क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. त्यानंतर आता गावसकर यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर कॉमेंट्री करताना धोनीच्या ऑटोग्राफबाबत इतर सहकाऱ्यांशी चर्चा सुरु होती. या दरम्यान गावसकर यांना भरुन आलं. गावसकर यांना धोनीबाबत बोलताना भरुन आलं. त्यांना स्पष्ट बोलता येत नव्हतं. त्यांचा आवाज स्पष्ट निघत नव्हता. यावरुन लिटील मास्टर धोनीबाबत किती भावूक झाले, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

गावसकर यांनी आपल्या मृत्यूआधी त्यांच्यासाठी हा ऑटोग्राफ घेतलेला शर्ट किती मौल्यवान आहे हे बोलून दाखवलं. “मला माझ्या मृत्यूआधी 2 क्षण पाहायला आवडतील. एक म्हणजे 1983 च्या वर्ल्ड कप ट्रॉफी उचलतानचा क्षण आणि त्यानंतर धोनी याने 2011 वर्ल्ड कपमध्ये मारलेला तो विजयी सिक्स, हे 2 क्षण पाहायला मला आवडेल”, असं म्हणताना गावसकर यांना अश्रू अनावर झाले.

गावसकर हे स्वत: या दोन्ही ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहेत. टीम इंडियाने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देव यांना वर्ल्ड कप उचलताना पाहून प्रत्येक भारतीयाचा उर भरून आला होता. प्रत्येक भारतीय कपिल देव यांच्यात स्वत:ला पाहत होता. गावसकर या वर्ल्ड कप विनिंग टीमचे सदस्य होते. तर त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी धोनीने टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन केलं. तेव्हाही गावसकर वानखेडे स्टेडियममध्ये हजर होते.

गावसकर काय म्हणाले?

“हा माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण आहे. या पठ्ठ्याने धोनीने काय नाही केलं? मला माहितीय की माझ्या जीवनातील हा शेवटचा टप्पा आहे. माझ्या जीवनातील हे काही अखेरचे क्षण आहेत. त्यामुळे जर मला 2 मिनिटांसाठी 2 क्षण जगायचे असतील, तर ते म्हणजे जेव्हा 1983 मध्ये कपिल देव यांनी उचलेली वर्ल्ड कप ट्रॉफी. दुसरं म्हणजे धोनी जेव्हा सिक्स मारुन ज्या पद्धतीने बॅट फिरवतो. हे 2 क्षण मी मृत्यूआधी पाहू इच्छितो”, असं गावसकर यांनी सांगितलं.

धोनीबाबत बोलताना गावसकर भावूक

गावसकर हे सर्व बोलत असताना नकळत त्यांचा उर भरून आला. त्यांच्या डोळ्यातू अश्रू निघाले. त्यावेळेस त्यांच्या शेजारी असलेला हरभजन सिंह हा देखील भावूक झालेला दिसून आला.