Krunal Pandya | “मी कुणालाही..” कॅप्टन होताच कृणाल पंड्याचे सूर बदलले!

| Updated on: May 18, 2023 | 8:56 PM

केएल राहुल याला दुखापत झाल्याने तो आयपीएलमधून बाहेर पडला. त्यामुळे कृणाल पंड्या याला लखनऊ सुपर जायंट्सच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Krunal Pandya | मी कुणालाही.. कॅप्टन होताच कृणाल पंड्याचे सूर बदलले!
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 वा मोसम आता अखेरच्या टप्प्यात आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स बाहेर झाले आहेत. तर गुजरात टायटन्सने आधीच प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं आहे. त्यामुळे 3 जागांसाठी 7 संघामध्ये आता लढाई आहे. या मोसमादरम्यान आणि आधी दुखापतीमुळे आणि इतर कारणांमुळे मोसमातून बाहेर पडावं लागलं. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी मोसमाआधी माघार घेतली. तर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याला 1 मे रोजी आरसीबी विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे केएल आयपीएल wtc final 2023 मधून बाहेर पडला.

केएल बाहेर झाल्याने गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि कृणाल पंड्या याला लखनऊच्या कर्णधापदाची जबाबदारी देण्यात आली. कृणालने केएलनंतर टीमला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राखलंय. आता कृणालने विधान केलंय. कृणाल नक्की काय बोललाय, हे आपण जाणून घेऊयात.

मी कॅप्टन्सीबाबत शिकू इच्छितो. पण मी कुणाचीच नकल करत नाही, असं कृणालने म्हटलंय. “केएल टीममधून बाहेर झाल्याने अडचण वाढली. मात्र मी आव्हान स्वीकारलं. मी टीमचा उपकर्णधार होतो. मी आतापर्यंत मला हवं त्याप्रमाणे क्रिकेट खेळत आलोय आणि खेळतोय. मी कॅप्टन्सीही त्यानुसारच करतोय. मी कधीही कुणाची कॉपी केली नाही. मात्र मी प्रत्येकाकडून काही न काही शिकण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. मला सर्वकाही माझ्या पद्धतीने करायचंय”, असं कृणाल म्हणाला.

“जर मी माझ्या पद्धतीने योजना राबवली तर अपेक्षित निकाल येण्याची शक्यता अधिक असते. मी कठोर मेहनतीने आणि दृढ निश्चयाने क्रिकेट खेळलोय. हीच बाब लखनऊच्या नेतृत्वाबाबतही लागू होते”, असं कृणालने स्पष्ट केलं.

दरम्यान लखनऊला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. लखनऊने गेल्या सामन्यात मुंबईवर शेवटच्या ओव्हरमध्ये 5 धावांनी विजय मिळवला होता. लखनऊ या मोसमात आपला अखेरचा सामना हा केकेआर विरुद्ध खेळणार आहे. लखनऊने केकेआरला पराभूत केल्यास 17 पॉइंट्स होतील. त्यामुळे लखनऊ कोणत्याही स्थितीत प्लेऑफसाठी पात्र ठरेल. मात्र लखनऊने हा सामना गमावला, तर दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर भवितव्य ठरेल.

लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान कायल मेयर्स, यश ठाकूर, कृष्णाप्पा गोतम, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग चरक, अमित मिश्रा, आवेश खान, अर्पित गुलेरिया, करुण नायर, मनन वोहरा, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, सू्र्यांश शेडगे आणि करण शर्मा.