लखनऊ | आयपीएल 16 व्या मोसमातील पहिला डबल हेडर सामन्यातील दुसरा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने पहिले बॉलिंगचा निर्णय घेत लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीचा हा या मोसमातील पहिलाच सामना आहे. दिल्ली या मोसमात नियमित कर्णधार ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत खेळतेय. पंत अपघातानंतर सावरत असल्याने त्याला या 16 पर्वात खेळता येत नाहीये. आपला स्टार खेळाडू आपल्यासोबत मैदानात नसल्याची उणीव दिल्ली टीम मॅनेजमेंटला जाणवतेय. मात्र आपल्या हुकमाच्या एक्क्यााठी दिल्ली टीमने केलेल्या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.
ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण कार अपघात झाला होता. पंत या अपघातात झालेल्या दुखापतीतून सावरतोय. पंतला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे पंतला मैदानापासून आणखी काही महिने दूर रहावं लागणार आहे. त्यामुळे पंतला आयपीएलच्या संपूर्ण 16 व्या मोसमाला मुकावं लागलंय. आपला हिरो आपला स्टार बॅट्समन सोबत नाही, आणि आपणही आपल्या टीमसोबत नाही, अशी खंत टीम मॅनेजमेंट आणि पंतला आहे.
दिल्लीच्या डगआऊटवर पंतची जर्सी
Jersey of Rishabh Pant in Delhi dugout.
A great gesture. ? pic.twitter.com/yzwwsxup8i
— Johns. (@CricCrazyJohns) April 1, 2023
पंतला शरीराने मैदानात हजर राहणं शक्य नाही. मात्र त्यानंतरही पंतने अनोख्या पद्धतीने मैदानात हजेरी लावलीय. दिल्ली टीम मॅनेजमेंटने पंतची 17 नंबरची जर्सी ही डगआऊटच्या वरील भागात लावलीय. टीम मॅनेजमेंटने यासह आम्ही पंतच्या पाठीशी आहोत, असा संदेश दिलाय. डगआऊटवर लावलेल्या पंतच्या जर्सीचा फोटो सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल झालाय.
पंत विकेटकीपर आणि कर्णधार अशा दोन महत्वाच्या भूमिका बजावायचा. मात्र कर्णधारपदाची जबाबदारी दिल्ली कॅपिट्ल्सने टीम मॅनेजमेंटने डे्विड वॉर्नर याला दिली आहे. तर विकेटकीपर बॅट्समन म्हणून पंत याच्या जागी अभिषेक पोरेल याचा समावेश केला गेला आहे. पोरेल याला 20 लाख रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतलं आहे.
लखनऊ प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मेयर्स, मार्क्स स्टॉयनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, मार्क वूड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई आणि आवेश खान.
दिल्ली प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिली रोसो, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद आणि मुकेश कुमार.