मुंबई : लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी केली. निर्धारत 20 षटकात 193 धावांचा डोंगर उभारला असून दिल्लीकरांना पहिला सामना जिंकण्यासाठी या लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करावा लागणार आहे. लखनऊ संघाकडून काइल मेयर्स याची 73 धावांची वादळी खेळी, निकोलस पूरन 36 धावांच्या जोरावर दिल्लीने संघाने 190 धावांचा टप्पा पार केलाय.
दिल्ली संघाने टॉस जिंकत लखनऊ संघाला फलंदाजासाठी आमंत्रित केलं होतं. सलामीला आलेल्या कर्णधार के. एल. राहुल आणि काइल मेयर्स यांनी सावध सुरूवात केली. मात्र राहुलला दुसऱ्याच षटकामध्ये चेतन साकारियाने 8 धावांवर बाद केलं. दुसऱ्या विकेटसाठी मोठी आणि चांगली भागीदारी झालेला पाहायला मिळाली. काइल मेयर्सने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला तर त्याला दीपक हुड्डाने साथ दिली. हुड्डा 17 धावा, मार्कस स्टॉइनिस 12 धावा, कृणाल पंड्या 15 धावा, निकोलस पूरनने 36 धावा केल्या.
दिल्ली संघाकडून वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि चेतन साकरियाने 2 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी 1 विकेट घेतली.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (डब्ल्यू), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिली रोसो, सरफराज खान (W), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार