LSG vs MI Head To Head | लखनऊ सुपर जायंट्स की मुंबई इंडियन्स, वरचढ कोण?

| Updated on: May 15, 2023 | 5:40 PM

IPL 2023 LSG vs MI Head To Head | लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ 16 व्या पर्वात पहिल्यांदाच आमनेसामने भिडणार आहेत. पाहा हेड टु हेड आकडेवारी

LSG vs MI Head To Head | लखनऊ सुपर जायंट्स की मुंबई इंडियन्स, वरचढ कोण?
Follow us on

लखनऊ | मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील यशस्वी टीम. मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2013 पासून एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल 16 व्या मोसमात मुंबईने आतापर्यंत 12 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये 14 पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. लखनऊ 12 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊ विरुद्ध मुंबई हे दोन्ही संघ 16 मे रोजी आमनेसामने असणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी प्लेऑफच्या हिशोबाने महत्वाचा असा आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. या मॅचमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांमधील हेड टु हेड आकडेवारी आपण जाणून घेऊयात.

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

लखनऊ विरुद्ध मुंबई हे दोन्ही संघ या हंगामात पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहेत. त्याआधी गेल्या मोसमात दोन्ही संघ एकूण 2 वेळा भिडले होते. या दोन्ही सामन्यात लखनऊने मुंबईचा धुव्वा उडवला होता. याचाच अर्थ असा की मुंबईला लखनऊ विरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आकड्यांनुसार लखनऊ मुंबईवर वरचढ आहे. मात्र सध्या मुंबईचे फलंदाज जोरात आहेत. त्यामुळे दोन्ही संघामध्ये काँटे की टक्कर होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे मुंबई विजय मिळवून लखनऊ विरुद्ध पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स टीम | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, प्रेराक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान बेंच स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक होडो , अर्पित गुलेरिया, मोहसिन खान, मार्क वुड, रोमॅरियो शेफर्ड, करुण नायर, नवीन-उल-हक, मनन वोहरा, कृष्णप्पा गौथम आणि करण शर्मा.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.