लखनऊ | लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर 5 धावांनी विजय मिळवला. लखनऊने यासह मुंबई इंडियन्स विरुद्ध विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. लखनऊने आयपीएल 2022 मध्ये मुंबईवर दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. तर आता या हंगामातही लखनऊने विजय मिळवत ही परंपरा कायम ठेवली. लखनऊने या विजयासह प्लेऑफचा मार्ग आणखी सोपा केला आहे. तर मुंबईला पराभवामुळे साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकावा लागणार आहे. सोबतच दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर मुंबईचं प्लेऑफचं भवितव्य ठरणार आहे.
या सामन्याच्या निकालानंतर मुंबई विरुद्धच्या सामन्यात लखनऊकडून 11 नाही, तर 12 खेळाडू खेळत असल्याचे म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे तो खेळाडू सर्वांसमोर खेळत होता. त्यानंतही अंपायर्सने रोखलं नाही. तो 12 वा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून लखनऊचा मेन्टॉर गौतम गंभीर होता. गंभीर डगआऊटमधून सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजांना इशाऱ्याने मार्गदर्शन करत होता. तसेच अधेमधे पाणी द्यायला जाणाऱ्या खेळाडूंद्वारे ही मेसेज मैदानात पोहचवत होता. विजय दहीया हा देखील असंच काही करत होता.
प्रत्येक सामन्यात टीममधील मेन्टॉर असंच काही खाणाखुणा करत असतात. हे असं चूक बरोबर, नंतरचा मुद्दा. पण मुंबईचा पराभव हा चाहत्यांच्या जिव्हारी लागलाय. त्यात सूर्यकुमार यादव हा देखील 7 धावांवर आऊट झाल्याने मुंबईच्या चाहत्यांचा तीळपापड झालाय. त्यामुळे लखनऊकडून 11 नाही, तर 12 खेळाडू खेळत असल्याचं म्हटलं जात आहे.
लखनऊने मार्क्स स्टोयनिस याच्या नाबाद 89 धावा जोरावर 3 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 177 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 178 धावांचं आव्हान देता आलं. मात्र लखनऊच्या गोलंदाजांनी मुंबईला 20 ओव्हरमध्ये 172 धावांवरच रोखलं.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मढवाल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग आणि मोहसिन खान.