लखनऊ | लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यातून टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. बॅटिंगसाठी आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र सामन्यातील दुसऱ्या ओव्हर दरम्यानच क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढणारी आणि वाईट बातमी आली. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल हा फिल्डिंग दरम्यान धावता धावता मैदानात कोसळला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.
आरसीबी कॅप्टन फाफ डु प्लेसिस याने दुसऱ्या ओव्हरमध्ये कव्हर ड्राईव्ह खेळला. फाफने मारलेला हा फटका रोखण्यासाठी केएल बॉल रोखण्यासाठी वेगात धावत सुटला. मात्र सीमारेषेआधी केएलला धावताना त्रास जाणवला आणि तो मैदानात कोसळला. केएलला तीव्र वेदना जाणवत होती. तो वेदनेने विव्हळत होता. तेवढ्यात लखनऊ मेडिकल टीमने मैदानात धाव घेतली.
केएल राहुल याला दुखापत
Wishing a speedy recovery to @klrahul
See you back on the field soon ????#TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/2DPo7W2OuK
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2023
केएलला सहकारी खेळाडूंनी हाताचा आधार देऊन उचललं. मात्र केएल चालण्याच्या स्थितीत नव्हता. यावरुन केएलला झालेली दुखापत तीव्र असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यानंतर केएल सहकाऱ्यांच्या खांद्याच्या आधारे मैदानाबाहेर गेला. केएलला हॅमस्ट्रिंगचा त्रास असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
केएल राहुल लंगडत लंगडत मैदानाबाहेर
Kl rahul leave the ground.#LSGvsRCB pic.twitter.com/m3so2nn684
— Nilesh (@Nilesht2003) May 1, 2023
दरम्यान केएल याला दुखापतीमुळे मोठ्या काळासाठी क्रिकेटला मुकावं लागू शकतं. केएलच्या दुखापतीबाबत जरी माहिती मिळाली नसली, तरी त्याला तीव्र वेदना होत असल्याचं दिसून आलं. आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. राहुलची या 15 सदस्यीय संघात निवड करण्यात आलेली आहे.त्यामुळे आता त्याआधी केएल या दुखापतीतून सावरतो की नाही, हे फार महत्वाचं असणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.