Virat Gambhir Dispute | गौतम गंभीर विरुद्धच्या राड्यानंतर विराट कोहली याचं पहिलं ट्विट, काय म्हणाला

| Updated on: May 02, 2023 | 5:25 PM

लखनऊ विरुद्धच्या विजयानंतर आरसीबीने ग्रँड सेलिब्रेशन केलं. आरसीबीने लखनऊवर मात करत पराभवाचा वचपा घेतला. यानंतर विराट कोहली याने ट्विट केलं आहे.

Virat Gambhir Dispute | गौतम गंभीर विरुद्धच्या राड्यानंतर विराट कोहली याचं पहिलं ट्विट, काय म्हणाला
Follow us on

लखनऊ | नेहमीच फलंदाजच क्रिकेट सामना जिंकून देतात, असं नाही. कधीकधी गोलंदाजही उल्लेखनीय कामगिरी करुन टीमच्या विजयाचा पाया रचतात, याचीच प्रचिती क्रिकेट चाहत्यांना 1 मे रोजी आली. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना लो स्कोअरिंग झाला. लखनऊसमोर विजयसाठी 127 धावांचं आव्हान होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी कमाल केली. आरसीबीने या छोट्या धावसंख्येचा उत्तम बचाव करत लखनऊवर 18 धावांनी मात केली.

या सामन्यादरम्यान आरसीबी माजी कर्णधार विराट कोहली आणि लखनऊचा फलंदाज नवीन उल हक यांच्यात तापातापी झाली. हाच विषय सामन्यानंतर हस्तांदोलनादरम्यान वाढला. विराट नवीन पुन्हा भिडले. यानंतर विराट आणि गौतम गंभीर हे दोघे आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा भिडले. या दोघांनी केलेल्या कृतीमुळे विराट आणि गंभीर या दोघांना सामन्याचं पूर्ण मानधन हे दंड म्हणून द्यावं लागणार आहे.

दरम्यान या सर्व राड्यानंतर विराट कोहली याने ट्विट केलंय. विराट कोहली याचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. विराट कोहली याने या ट्विटमध्ये काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊयात.

विराट कोहली याचं ट्विट

“आज रात्री शानदार विजय. लखनऊ इथे तुमच्या समर्थनासाठी खूप खूप प्रेम. तुम्ही आम्हाला सर्वांना पाठिंबा दिलात यासाठी धन्यवाद”, असं ट्विट विराटने सामना जिंकल्यानंतर केलं.

विराट ट्विटमध्ये काय म्हणाला?

दरम्यान आरसीबीचा हा या हंगामातील एकूण पाचवा विजय ठरला आहे. आरसीबीने यासह 10 पॉइंट्ससह पंजाब किंग्सला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आरसीबी आपला आगामी सामना हा 6 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध खेळणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.