Virat Kohli | विराटची विकेट घेतल्याचा उत्साह गोलंदाजाला नडला, पंचाने झटक्यात रडवलं?

| Updated on: May 02, 2023 | 9:07 PM

रवि बिश्नोई याने विराट कोहली याला आऊट केल्यानंतर जल्लोष करायला सुरुवात केली. मात्र त्यानंतर अंपायर आणि रवि बिश्नोई यांच्यात जे काय झालं ते व्हायरल झालंय.

Virat Kohli | विराटची विकेट घेतल्याचा उत्साह गोलंदाजाला नडला, पंचाने झटक्यात रडवलं?
Follow us on

लखनऊ | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने सोमवारी 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सवर 18 धावांनी मात केली. आरसीबीने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 126 धावा केल्या. यामुळे लखनऊ सुपर जायंट्सला 127 धावांचं आव्हान मिळालं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत लखनऊला सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली. आरसीबीने लखनऊला पावरप्लेमध्ये 4 झटके दिले. त्यानंतर ठराविक अंतराने लखनऊने एकामागोमाग विकेट गमावले आणि आरसीबीने 18 धावांनी कडक विजय मिळवला.

यासामन्यानंतर नवीन उल हक याच्यामुळे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तुफान राडा झाला. या राड्याने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. या तिघांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, जी कुणाच्याच लक्षात आली नाही. नक्की काय झालं, आपण जाणून घेऊयात.

लखनऊ सुपर जायंट्सचा लेग स्पिनर रवि बिश्नोई याने विराट कोहली याला आऊट केलं. त्यानंतर रविने मैदानात सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. मात्र यावेळेस रविला अंपायरचा जोरदार फटका खावा लागला.

नक्की काय झालं?

रवी बिश्नोई आरसीबीच्या डावातील 10 वी ओव्हर टाकायला आला. रविने या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विराट कोहली याला 31 धावांवर आऊट केलं. विराटला विकेटकीपर निकोलस पूरन याने स्टंपिंग केलं. विराटला आऊट केल्याने रवि फार आनंदी झाला होता. मात्र या दरम्यान चुकून अंपायरकडून रवि बिश्नोईच्या तोंडावर जोरदार फटका बसला. अचानक लागलेल्या या फटक्यामुळे रविला चक्रावला. अंपायरकडून चुकून हा सर्व प्रकार झाला. त्यामुळे अंपायरने माफी मागितली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे.

रवि बिश्नोईच्या तोंडावर जोरदार फटका

रवि अंपायरकडे कॅप घ्यायला चालला होता. तेव्हा अंपायरचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी होतं. तेव्हाच अंपायरचा हात रविच्या तोंडावर लागला. दरम्यान रविने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 21 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स मिळवल्या. रविने ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली हे 2 मोठे विकेट्स घेतल्या.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.