Virat vs Gambhir | विराट कोहली-गौतम गंभीर यांच्या राड्यात आता पोलिसांची एन्ट्री

| Updated on: May 02, 2023 | 11:08 PM

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात नवीन उल हक याच्यामुळे कडाक्याचं वाजलं. त्यानंतर आता या वादात पोलिसांची एन्ट्री झाली आहे.

Virat vs Gambhir | विराट कोहली-गौतम गंभीर यांच्या राड्यात आता पोलिसांची एन्ट्री
Follow us on

लखनऊ | आयपीएल 16 व्या हंगामात विराट कोहली आणि गौतम गंभीर हे पुन्हा 10 वर्षांनी एकमेकांना भिडले. याआधी दोघेांमध्ये 2013 मध्ये कडाक्याचं वाजलं होतं. त्यानंतर आता हे दोघे आमनेसामने आले होते. या दोघांनी एकमेकांवर हात उगारायचाच राहिला होता, बाकी सर्व काही झालं होतं. दोघांमध्ये पंचांनी आणि सहकारी खेळाडूंनी मध्यस्थी करुन विषय संपवण्याचा प्रयत्ने कला. मात्र त्यानंतरही सोशल मीडियावर या विषयाची सामन्यापेक्षा अधिक चर्चा रंगली. विराट आणि गंभीर या दोघांमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू नवीन उल हक याच्यावरुन जुंपली. या तिघांनी केलेल्या घटनाबाह्य वर्तणुकीमुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. आता या सर्व वादात पोलिसांनी उडी घेतली आहे.

पोलिसांनी मंगळवारी 2 मे रोजी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये पोलिसांनी गंभीर आणि विराटचे फोटो वापरले आहेत. पोलिसांनी या दोघांचा फोटो वापरुन सर्वसामांन्यांना जागरुक करण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या काही वर्षांपासून सायबर क्राईम हा प्रकार फोफावलाय. लोकं मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग करतात. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक सर्वाधिक प्रमाणात होत आहे. याबाबत कोलकाता पोलिसांनी सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

हे सुद्धा वाचा

कोलकाता पोलिसांनी धोकादायक एप्सपासून सर्वसामान्यांना रोखण्यासाठी विराट आणि गंभीरच्या फोटोचा हुशारीने वापर केला आहे. या दोघांच्या फोटोचं मीम्स करुन पोलिसांनी सावध केलंय. कोलकाता पोलिसांनी शेअर केलेल्या या फोटोत विराट आणि गंभीर दोघेही तोंडावर बोट ठेवून शांत राहण्याचा सल्ला देत आहेत. पोलिसांनी या फोटोच्या माध्यमातून सायबर क्राईमपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

अनेकदा अनोळखी नंबरवरुन कॉल येतात. हे कॉल साधारणपणे बँकिंग, होम लोन आणि मार्केटिंग संबंधित असतात. विविध स्किम्स आणि भरपूर फायद्याच्या मोहात पाडून हे झोलर लोक सर्वसामांन्याच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतात. या झोलर लोकांना हवा असतो तो तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी. ओटीपी सांगितल्यानंतर तुमच्या खात्यात असलेली सर्व रक्कम एका सेकंदात रिकामी होते. त्यामुळे सर्वसामांन्यांनी अशा कॉलवरुन ओटीपी मागितल्यास विराट आणि गंभीरप्रमाणे शांत राहा, असं आवाहन करण्यात आलंय.

कोलकाता पोलिसांचं ट्विट

थोडक्यात काय, तर कोलकाता पोलिसांनी विराट आणि गंभीर या दोघांच्या वादात अशी उडी घेत सर्वसामांन्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तुमच्याकडेही कॉलद्वारे कुणी ओटीपी मागितला तर, विराट आणि कोहली यांच्या प्रमाणे वाद न घालता शांत राहण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे नुकसान होणार नाही.