मुंबई : आयपीएलमधील दहावा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यामध्ये सूरु आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाने 122 धावांचं लक्ष्य लखनऊला दिलंस आहे. स्लो पीचमुळे फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. कृणाल पंड्या आणि अमित मिश्राने अनुक्रमे 3 आणि 2 विकेट्स घेतल्या मात्र चर्चा आहे ती मिश्राने घेतलेल्या अफलातून कॅचची. वयाच्या 40 व्या वर्षी मिश्राने हवेत उडी घेत सुपरकॅच पकडत वय हे फक्त आकडे असल्याचं दाखवून दिलं आहे.
पाहा व्हिडीओ-
Age just a number for 40-year-old Amit Mishra!
A couple of wickets with the ball and this banger on the field!#IPL2023 #LSGvsSRH #KLRahul #AidenMarkram #SRHvsLSG #TATAIPL #KrunalPandya #HarryBrookpic.twitter.com/PWVrj16VGQ— OneCricket (@OneCricketApp) April 7, 2023
अमित मिश्राने 4 ओव्हरमध्ये 23 धावादेत 2 विकेट्स घेतल्या. हैदराबादच्या वॉशिंग्टन सुंदर 16 धावांवर आणि आदिल राशीदला 3 धावांवर बाद केलं.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन)- केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन) – मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, आदिल रशीद