मुंबई | आयपीएल 16 व्या हंगामात आतापर्यंत 10 सामने पार पडले आहेत. शनिवारी 8 एप्रिल रोजी 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. यातील पहिला आणि एकूण 1 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 12 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडणार आहे. हा सामना आतपर्यंतच्या एकूण 10 सामन्यांना पुरुन उरणारा ठरणार आहे. कारण या सामन्यात आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने भिडणार आहेत. मुंबईने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर चेन्नईने 4 वेळा हा कारनामा केला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना नक्कीच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पैसावसूल मॅच पाहायला मिळणार आहे. या सामन्यानिमित्ताने आपण दोन्ही संघांमधील आकडेवारी पाहणार आहोत.
आयपीएलमध्ये एका मोसमामध्ये प्रत्येक संघ एका टीमविरुद्ध एकूण 2 वेळा भिडतं. मात्र मुंबई आणि चेन्नई यांचं नातं या पलीकडचं आहे. साखळी फेरी व्यतिरिक्त मुंबई-चेन्नई अनेकदा फायनलमध्येही भिडले आहेत.
आतापर्यंत उभयसंघांमध्ये एकूण 34 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा बोलबाला राहिला आहे. मुंबईने 34 पैकी 20 सामन्यांमध्ये चेन्नईवर विजय मिळवला आहे. तर उर्वरित 14 मॅचमध्ये चेन्नईने बाजी मारली आहे. मात्र या दोन्ही संघातील सामन्याचा अंदाज हा आकड्यांवरुन बांधणं चुकीच ठरेल, कारण दोन्ही संघात मॅचविनर खेळाडू आहेत. जे कधीही सामना एकहाती फिरवण्याची क्षमता ठेवतात.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.
आयपीएल 2023 साठी टीम सीएसके | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.