मुंबई | रोहित शर्मा आयपीएलमध्ये 2013 पासून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतोय. आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते 2012 पर्यंत या 5 वर्षांच्या कालावधीत सचिन तेंडुलकर आणि यासारख्या इतर दिग्गज खेळाडूंनी मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी केली. मात्र या दिग्गजांना आपल्या अनुभवाच्या जोरावर मुंबईला चॅम्पियन करता आलं नाही. मात्र रोहितने कॅप्टन्सीची सूत्र हातात घेताच पहिल्याच मोसमात म्हणजेच 2013 मध्ये मुंबईला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. रोहितने फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करुन 2010 सालचा वचपा घेतला आणि मुंबईला ट्रॉफी जिंकून दिली. त्यानंतर पुढे 4 वेळा आणि एकूण 5 वेळा मुंबईला आयपीएलमधील यशस्वी टीम म्हणून बहुमान मिळवून दिला.
रोहित शर्माच्या नेतृत्वात 2013 पासून मुंबई इंडियन्सला प्रत्येक मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. मुंबईने हीच परंपरा या 16 व्या हंगामातही कायम ठेवली आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभूत केलं. त्यानंतर रविवारी 8 एप्रिल रोजी घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामना पार पडला.
मुंबई इंडियन्सचा हा या मोसमातील घरच्या मैदानातील पहिलाच सामना होता. मुंबईने मोसमातील आपला पहिला सामना गमावला होता. त्यामुळे मुंबई वानखेडे स्टेडियमवर पहिलावहिला विजय मिळवेल, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांनी होती. मात्र चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला.
चेन्नईने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्स आणि 11 चेंडूंआधी विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी दिलेलं 158 धावांचं आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नईचा हा या मोसमातील 3 सामन्यांमधील दुसरा विजय ठरला. तर पलटणचा सलग दुसरा पराभव ठरला.
मुंबईचा घरच्या मैदानात आपल्या घरच्यांसमोर (क्रिकेट चाहते) पराभव झाला. दरम्यान रोहित शर्मा याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहितने या फोटोत आपल्या टोपीने तोंड लपवलं आहे.
Not a great start to IPL 2023 for Mumbai Indians and Rohit Sharma. Hopefully a strong comeback in the coming matches by MI and The Hitman! pic.twitter.com/SqhyGKoBNc
— Sanju Here ?? (@me_sanjureddy) April 8, 2023
“टीममधील अनुभवी खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. यामध्ये मी सुद्धा आहे. आयपीएल खेळ कसा आहे, हे आम्ही समजतो. आम्हाला मुमेंटमची गरज आहे. आता फक्त 2 सामनेच हरलो आहोत. मात्र पुढे आम्ही मुमेंटम मिळवलं तर चांगंल राहिल. मात्र असं न केल्यास अडचणी वाढतील. आम्हाला ही गोष्ट डोक्यात फिट करावी लागेल”, असं रोहितने सांगितलं.