मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये मुंबईमधील वानखेडे स्टेडिअमवर सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये मुंबई संघ प्रथम फलंदाजी करत आहे. मुंबईची सुरूवात खराब झाली असून 10 ओव्हरच्या आतमध्ये अर्धा संघ तंबूत परतला आहे. सामन्यामध्ये एक घटना घडली ती म्हणजे रविंद्र जडेजा याने आपल्याच बॉलिंगवर जो कॅच घेतला तो जर नसता घेतला तर रूग्णवाहिका आणावी लागली असती. नेमकं असं काय घडलं होतं?
मुंबईचा रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर मुंबईने सर्वाधिक पैसे खर्च केलेला खेळाडू ग्रीन आणि तिलक वर्मा मैदानात होते. दोघे सावधपणे खेळत होते, त्यावेळी ग्रीनने जडेजाच्या चेंडूवर जोरात फटका मारला. चेंडू इतका जोरात होता की समोर जडेजाने हात फक्त वर केले तेव्हा त्याच्या एकदम हातात जावून बसला. जर त्या ठिकाणी जडेजा नसता तर स्टम्पजवळ असलेल्या पंचांना लागला असता. हा चेंडू काही फक्त लागला नसता त्यांना मोठी इजाही झाली असती. कारण ग्रीनने चेंडूच तितक्या वेगाने मारला होता.
पाहा व्हिडीओ-
Only RaJa could have caught that bullet ?pic.twitter.com/BRdfj4BXn8
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 8, 2023
रविंद्र जडेजाच्या हिमतीला दाद द्यावी लागेल कारण इतर दुसरा कोणता खेळाडू असता तर वाटत नाही त्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला असता. जडेजाने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान, मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 158 धावांचं लक्ष्य सीएसकेला दिलं आहे. मुंबईचा संघ या लक्ष्यापासून सीएसकेला रोखण्यासाठी काय योजना आखतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे इम्पॅक्ट खेळाडूमध्ये अर्जुनला संधा मिळते याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.