मुंबई : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी असलेले मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वातील सर्वांचं लक्ष लागलं आहे. थरारक सामन्यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सामन्याला काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. त्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कमी काळात प्रसिद्धीच्या जोतात आलेली गौतमी पाटीलला रोहित की धोनी असं विचारल्यावर ती काय उत्तर देते तो व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गौतमी पाटीलला विचारण्यात येतं की रोहित की धोनी? यावर ती धोनी असं उत्तर देते. महत्त्वाचं म्हणजे गौतमी त्यानंतरच्या दुसऱ्या जो प्रश्न विचारण्यात येतो त्यावर एकदम हुशारीने उत्तर देते. मुंबई इंडिअन्स की चेन्नई सुपर किंग्ज? यावर ती मुंबई असं उत्तर देते. एका यु ट्यूब चॅनेलवर तिने मुलाखत दिली होती. त्यामधील कट केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चेन्नईने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांच्या अंतिम अकरा खेळाडूंची यादी समोर आली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ