मुंबई | आयपीएल 16 वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. साखळी फेरीतील अवघे काहीच सामने बाकी राहिले आहेत. दिल्लीचा अपवाद वगळता आता उर्वरित एकूण 9 संघामध्ये प्लेऑफच्या 4 स्थांनासाठी कडवी झुंज पाहायला मिळतेय. आगामी सामन्यांमध्ये एक पराभवही हा त्या त्या टीमला प्लेऑफपासून दूर ठेवणारा ठरू शकतो. त्यामुळे आपल्या टीमच्या जोरावर थेट एन्ट्री मिळवण्यासाठी आता उर्वरित संघांमध्ये आरपारची लढाई पाहायला मिळणार आहे. यामुळे प्रत्येक खेळाडू हा 100 टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहे.
गतविजेता गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरु शकते. गुजरातच्या नावावर एकूण 8 विजयांसह 16 पॉइंट्स आहेत. त्यामुळे गुजरात फक्त प्लेऑफला क्वालिफाय होण्यासाठी एका विजयापासून दूर आहे. शुक्रवारी 12 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचा आमनासामना होणार आहे. गुजरात टायटन्स टीमला या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफसाठी क्वालिफाय होण्याची संधी आहे.
मुंबई-गुजरात या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 25 एप्रिल रोजी हे दोन्ही संघ भिडले होते. तेव्हा गुजरातने मुंबईवर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 55 धावांन विजय मिळवला होता. यामुळे आता मुंबई गुजरातला घरात बोलवून धुणार का, याकडे पलटण चाहत्यांचं लक्ष असेल. या निमित्ताने आपण सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना हा 12 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील मॅचचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या सर्व चॅनेलवर पाहता येईल.
क्रिकेट रसिकांना मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामना हा लॅपटॉप आणि मोबाईलवर जिओ एपच्या मदतीने पाहता येईल. विशेष म्हणजे एकूण 12 भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येईल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुधारसन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.