मुंबई : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये यंदाच्या मोसमातील दुसरा प्ले-ऑफमधील सामना रंगणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून गुजरात टायटन्स 15 धावांनी पराभूत झाला होता. आता दोन्ही संघ आपली सर्व ताकद लावताना दिसतील. यंदाच्या पर्वातील हा सेकंड लास्ट सामना असून ड्रीम 11 साठी खालील दिलेला संघ तुम्हाला घसघशीत यश मिळवून देऊ शकतो.
मुंबई इंडियन्सचा यंदाच्या पर्वातील प्रवास खूप रोमांचक होता. लीग टप्प्यात मेन-इन-ब्लूने 8 गेम जिंकले आणि 14 पैकी 6 गमावले. 16 गुणांसह त्यांच्याकडे गुणतालिकेत चौथ्या स्थानावर येण्यासाठी पुरेशी स्थिती होती. नंतर एलिमिनेटरमध्ये, पलटणने क्वालिफायर 2 मध्ये पोहोचण्यासाठी लखनऊला हरवत इथपर्यंत मजल मारली आहे.
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये एकूण 3 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 16 व्या मोसमातील साखळी फेरीत एकूण 2 वेळा आमनेसामने हे दोन्ही संघ आले आहेत. मुंबईने या 3 पैकी 2 मॅचमध्ये गुजरातचा सुपडा साफ केलाय. तर गुजरातनेही एकदा विजय मिळवलाय.
कीपर : इशान किशन
फलंदाज: सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, शुभमन गिल, डेव्हिड मिलर
अष्टपैलू: हार्दिक पांड्या, कॅमेरून ग्रीन
गोलंदाज: राशिद खान, मोहम्मद शमी, आकाश मधवाल, नूर अहमद
कर्णधार : सूर्यकुमार यादव किंवा शुबमन गिल
उपकर्णधार : तिलक वर्मा किंवा इशान किशन
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दासून शनाका, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, पियुष चावला, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल