मुंंबई : मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 219 धावांचं आव्हान दिलं आहे. यामध्ये स्टार खेळाडू सूर्यकुमार कुमार यादव याने 49 चेंडूत 103 धावांची शतकी खेळी केली आहे. सूर्याने आपल्या खेळीमध्ये 11 चौकार आणि 6 षटकार मारले. हॅरी ब्रूक, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल यांच्यानंतर सूर्यकुमार यादव हा आयपीएल 16 व्या मोसमात शतक करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.
सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या म्हणजे हायस्कोअर करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. मुंबईकडून सनथ जयसूर्या याने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 48 बॉलमध्ये नाबाद 114 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा याने 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नॉट आऊट 109 रन्स केल्या. तर आता सूर्याने 49 बॉलमध्ये नाबाद 103 धावांची शतकी खेळी केली.
सूर्यकुमार यादव याने शतक ठोकत मुंबई इंडियन्सची गेल्या 8 वर्षांची प्रतिक्षा संपवली. मुंबई इंडियन्सकडून तब्बल 8 वर्षांनंतर पहिल्यांदाच फलंदाजांने शतक ठोकलं. सूर्यकुमार यादवने ही कामगिरी करुन दाखवली. सूर्याच्या आयपीएल कारकीर्दीतील हे पहिलवहिलं शतक आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (W), रोहित शर्मा (C), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय