मुंबई : आयपीएलमध्ये तब्बल 10 वर्षांनी तेंडुलकर मुंबईकडून खेळताना दिसला. (MI vs KKR 2023) हा ज्युनिअर तेंडुलकर असून अखेर आज त्याला आयपीएलमध्ये डेब्यू (Arjun Tendulkar debue) करण्याची संधी मिळाली आहे. अर्जुन तेंडुलकर याला मुंबईने (MI) आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं मात्र त्याला खेळण्याची संधी दिली नव्हती. आजच्या सामन्यामध्ये त्याला संधी मिळाली, रोहित शर्माने अर्जुनला डेब्यू कॅप दिली त्यावेळी तो भावूक झालेला दिसून आला.
पाहा व्हिडीओ-
That moment when #ArjunTendulkar received his@mipaltan cap from #RohitSharma? pic.twitter.com/zmrstTtBPh
— Smriti Sharma (@SmritiSharma_) April 16, 2023
रोहित शर्माने त्याला कॅप दिल्यानंतर अर्जुनने त्याला मिठी मारली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अर्जुनने मुंबईकडून पहिली ओव्हर टाकली यामध्ये त्याने 5 धावा दिल्या.
अर्जुनचा पहिला सामना पाहण्यासाठी तेंडुलकर कुंटंबिय उपस्थित होतं. अर्जुनची बहिण सारासुद्धा हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहे. स्वत: सचिनही सामना सुरू होण्याआधी अर्जुनला टिप्स देताना दिसला. पहिल्या सामन्यात त्याला विकेट मिळाली नाही, 2 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या तर आपल्या स्पेलमधील 6 बॉल त्याने निर्धाव टाकले.
सचिनने आयपीएलमधील शेवटचा सामना याच मैदानावर खेळला होता. 13 मे 2013 रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तेंडुलकरने 31 चेंडूत 38 धावा केल्या. दुखापतीनंतर त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.