मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएलमधील 22 वा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये मुंबईकडून अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केलं असून त्याला अर्षद खान याच्या जागेवर संघात सामील करून घेण्यात आलं आहे. कोलकाता संघ प्रथम फलंदाजीला उतरलेला असून मुंबईकडून अर्जुन तेंडुलकर याने पहिली ओव्हर टाकली, यामध्ये त्याने 5 धावे दिल्या. अर्जुनच्या पदार्पण सामन्यासोबत सचिन तेंडुलकर याचं खास कनेक्शन आहे.
मुंबईचं वानखेडे स्टेडिअम सर्वांना माहित आहे. या स्टेडिअममध्ये अनेक मोठे सामने झालेले सर्वांना पाहिले आहेत. 2011 साली महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली जिंकलेला फायनल सामनाही वानखेडे मैदानावर झाला होता. सचिनच्या कनेक्शनबद्दल बोलायचं झालं तर त्याने आयपीएलमधील शेवटचा सामना याच मैदानावर खेळला होता. 13 मे 2013 रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तेंडुलकरने 31 चेंडूत 38 धावा केल्या. दुखापतीनंतर त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.
याच मैदानावर आज अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केलं आहे. कोलकाताविरूद्ध अर्जुन आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळत आहे. रोहित शर्माने अर्जुनला कॅप देत त्याचं अंतिम 11 मध्ये स्वागत केलं. मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आधीच या सामन्यातून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चर 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध संघाचा पहिला सामना खेळला होता परंतु दुखण्यामुळे तो त्यानंतरच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या संघात जोफ्रा आर्चरच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.