मुंबई | मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 22 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध घरच्या सामन्यातून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा बाहेर झाला आहे.
टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात आले. केकेआरकडून नितीश राणा आला. तर मुंबईकडून रोहित शर्मा येणार असं अपेक्षित होतं. मात्र ऐनवेळेस सूर्यकुमार यादव मैदानात आला. त्यामुळे पलटणच्या चाहत्यांना धक्का बसला.
सूर्याने टॉस जिंकल्यानंतर रोहित हा दुखापतीमुळे खेळत नसल्याचं त्याने सांगितलं.
सूर्यकुमार यादव याची आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याच्यावर कर्णधार म्हणून अधिकची जबाबदारी आहे. सूर्याला गेल्या अनेक सामन्यांपासून अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. सूर्याला काही सामन्यांमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे सुर्या आता नेतृत्वाची जबाबदारी कशी सांभाळतो, याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यां हे दोन्ही संघ एकूण 32 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. मुंबईने केकेआरला तब्बल 22 वेळा पराभूत केलंय. तर कोलकाताने मुंबईवर 9 वेळा विजय मिळवला आहे. मात्र गेल्या 3 सामन्यांमध्ये केकेआर मुंबईवर वरचढ राहिली आहे. केकेआरने मुंबईवर गेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात आता काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.
कोलकात नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.