MI vs KKR IPL 2023 Live Streaming | मुंबई विरुद्ध कोलकाता आमनेसामने, सामन्याबाबत सर्वकाही एका क्लिकवर

| Updated on: Apr 15, 2023 | 11:18 PM

रविवारी 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध भिडणार आहे. सामन्याबाबत जाणून घ्या एका क्लिकवर

MI vs KKR IPL 2023 Live Streaming | मुंबई विरुद्ध कोलकाता आमनेसामने, सामन्याबाबत सर्वकाही एका क्लिकवर
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 16 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्सचा हा या मोसमातील एकूण चौथा सामना असणार आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा हा पाचवा सामना असेल. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 3 पैकी 1 मॅचमध्ये विजय मिळवलाय. तर केकेआरला 4 पैकी 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 2 सामन्यात विजय मिळवला. मुंबईने गेल्या सामन्यात विजय मिळवलाय. तर केकेआरला 14 एप्रिलला झालेल्या सामन्यात 23 धावांची पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे मुंबई आणि केकेआरसाठी हा सामना महत्वाचा असा असणार आहे. दरम्यान या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

मुंबई विरुद्ध कोलकाता सामना कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना हा वानखेडे स्टेडियम, मुंबई इथे खेळवण्यात येणार आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात?

मुंबई विरुद्ध केकेआर यांच्यातील सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त 3 वाजता टॉस होणार आहे.

सामना कुठे पाहता येणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच जिओ सिनेमा एपवरही मॅच बघता येईल. सोबतच टीव्ही 9 मराठी या वेबसाईटवर तुम्हाला सर्व अपडेट्स जाणून घेता येतील.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

कोलकाता नाईट रायडर्स टीम | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, नारायण जगदीसन, वैभव अरोरा, सुयश शर्मा , डेव्हिड वेईस, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, लिटन दास आणि जेसन रॉय.