MI vs KKR | सूर्यकुमार-इशान जोडीचा धमाका, केकेआरवर 5 विकेट्सने मात, पलटणचा सलग दुसरा विजय

| Updated on: Apr 16, 2023 | 8:12 PM

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 5 विकेट्सने पराभव केला. मुंबई इंडियन्सचा वानखेडे स्टेडियममधील हा या मोसमातील पहिला विजय ठरला आहे.

MI vs KKR | सूर्यकुमार-इशान जोडीचा धमाका, केकेआरवर 5 विकेट्सने मात, पलटणचा सलग दुसरा विजय
Follow us on

मुंबई | मुंबई इंडियन्स टीमने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 17.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पू्र्ण केलं. मुंबईचा या मोसमातील हा एकूण दुसरा आणि घरच्या मैदानातील म्हणजेच वानखेडे स्टेडियममधील पहिला विजय ठरला. इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे दोघे मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले.

मुंबईकडून इशान किशन याने 25 बॉलमध्ये 5 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय रोहित शर्मा याने 20 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याला नेतृत्व मिळाल्यानंतर सूर गवसला. सूर्याने 25 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्स ठोकून 43 रन्स केल्या. टिळक वर्मा याने 30 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं. टीम डेव्हिडने निर्णायक क्षणी 24 धावांची नाबाद खेळी केली. केकेआरकडून सूयश शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर सुनिल नारायण, वरुण चक्रवर्थी आणि लॉकी फर्ग्यूसन या तिघांनी 1 विकेट घेतली.

मुंबईचा सलग दुसरा विजय

केकेआरची बॅटिंग

दरम्यान त्याआधी मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. केकेआरकडून वेंकटेश अय्यर याने 104 धावांची शतकी खेळी केली. वेंकटेशशिवाय इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. केकेआरकडून रहमुल्लाह गुरबाज याने 8, कॅप्टन नितीश राणा याने 5, शार्दुल ठाकूर 13, रिंकू सिंह 18, आंद्रे रसेल 21* आणि सुनील नारायण याने 2* धावांची खेळी केली. तर मुंबई इंडियन्सकडून हृतिक शौकीन याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. कॅमरुन ग्रीन, दुआन जान्सेन, पियूष चावला आणि रिले मेरेडिथ या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान या विजयानंतर मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये 4 पॉइंट्ससह सातव्या क्रमांकावर पोहचली आहे. मुंबई आपला पुढील सामना हा येत्या मंगळवारी 18 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. मुंबईचा हा सामना जिंकून विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.