मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामधील सामन्यामध्ये मुंबईने 81 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. मुंबई प्ले-ऑफमध्ये जाईल की नाही हे नक्की नव्हतं मात्र एक संधी मिळाल्यावर पाच वेळा चॅम्पिअन असणाऱ्या पलटणने त्या संधीचं सोन केलेलं आहे. मुंबईने दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना लखनऊ संघ 101 धावांवर ऑल आऊट झाला. या विजयासह मुंबईला आता फायनलपासून एक पाऊल दूर आहे. तर आजच्या विजयामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आकाश मधवाल या युवा खेळाडूने बजावली.
आकाश मधवाल याने पाज विकेट्स घेतल्या त्यासह एक रनआऊटही केला. या पठ्ठ्याने फक्त मुंबईला विजयच नाही मिळवून दिला नाहीतर आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपलं एक नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं आहे. आकाशने या प्ले-ऑफ सामन्यामध्ये पाच विकेट घेतल्या, याआधी एकाही खेळाडूला अशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
Paltan, use this post to give Akash a ????-? ✋??#OneFamily #LSGvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 pic.twitter.com/GKnwYiJgiN
— Mumbai Indians (@mipaltan) May 24, 2023
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकाश मढवाल हा अनकॅप खेळाडू असल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आकाश मढवाल याने आपल्या 4 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. मागील 4 सामन्यामध्ये त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. उत्तराखंडकडून आयपीएल खेळणारा हा तो पहिलाच खेळाडू आहे.
दरम्यान, आकाश मढवाल याने रोहित शर्माचं कौतुक केलं. रोहित मला आत्मविश्वास वाढवण्यास खूप मदत करतो. गुजरातसाठी आणखी कष्ट घेईल आणि संघासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करेलं असं आकाश मढवाल याने सामना संपल्यानंतर सांगितलं.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि मोहसीन खान.