मुंबई : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडिअन्स का आहे हे पलटणने लखनऊला प्ले-ऑफच्या सामन्यामध्ये पराभूत करत दाखवून दिलं आहे. नशिबाने एक संधी दिली आणि मुंबई संघाचा अंतिम 4 मध्ये समावेश झाला. आता पहिल्या एलिमिनेटर सामन्यामध्येच पलटणने लखनऊ संघाला घरचा रस्ता दाखवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा खेळाडूंनी सांघिक कामगिरी केली. अवघ्या क्रिकेट वर्तुळाचं आकाश मधवाल या युवा गोलंदाजाने आपल्याकडे वेधून घेतलं. सामना संपल्यावर प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या आकाश मधवाल याला बुमराहबाबत एक प्रश्न विचारला त्यावर त्याने दिलेल्या उत्तराची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
आजच्या चमकदार कामगिरीनंतर सामना झाल्यावर आकाश मधवालनोबत बातचीत केली. यावेळी, मी खूप सराव करत होतो आणि संधीची वाट पाहत होतो. जेव्ह नेटमध्ये सराव करतो तेव्हा टीम मॅनेजमेंटचं लक्ष असतं. म्हणून त्यावेळी जितकं चांगलं करता येईल ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचं आकाशने सांगितलं. यावेळी बोलताना त्याला आता तु संघामध्ये जसप्रीत बुमराह याची जागा घेतली आहेस असं वाटतं का?, यावर बोलताना जसप्रीत बुमराह त्याच्या जागी आहे आणि मी मला माझ्या जागी असूद्या, असं उत्तर दिलं.
येणाऱ्या सामन्यामध्येसुद्धा चांगली कामगिरी करायची आहे. आजच्या पाच विकेट्समधील निकोलस पूरन याची विकेट खास असल्याचंही आकाशने सांगितलं. आकाश मढवाल याने यासह आयपीएल प्लेऑफ इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेत दिग्गजांना मागे टाकलं. मढवालने डग बॉलिंजर, धवल कुलकर्णी आणि जसप्रीत बुमराह यांना मागे टाकलं आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि मोहसीन खान.