मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात महत्त्वाचा सामना सुरु आहे. या सामन्यातील प्रत्येक चूक संघाला चांगलीच महागात पडणार आहे. अशीच चूक रोहित शर्माचा झेल सोडून रवि बिश्नोईने केली. लखनऊ सुपर जायंट्सने 20 षटकात 3 गडी गमवून 177 धावा केल्या. लखनऊ समोर विजयासाठी 178 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान लखनऊच्या मैदानावर पाहिलं तर मोठं आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि इशान किशनने सावध सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी चांगली भागीदारी केली. एक क्षण असा आला की रोहित शर्मा आऊट असंच सर्वांना वाटलं. पण त्या चेंडूवर सिक्स गेला.
पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने यश ठाकुरला पुल शॉट मारला. हा चेंडू रवि विश्नोईच्या हातात बसला. पण सिक्सवर तोल गेल्याने तो सीमारेषेवर पडला. त्यामुळे आऊट होण्याऐवजी सिक्स गेला. यामुळे लखनऊच्या डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंनी डोक्यावर हात मारला. हा षटकार कदाचित शेवटच्या षटकात महागात पडू शकतो.
Ravi Bishnoi Dropped an easy catch of Rohit Sharma ?
Impact player Ambani in action. pic.twitter.com/N3g3WkTaVu
— KT (@IconicRcb) May 16, 2023
रोहित शर्मा मोठी खेळी करेल असं वाटत असताना रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर विकेट टाकली. लाँग ऑनवर रोहित शर्माने उत्तुंग फटका मारला. तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या दीपक हुड्डाने झेल घेतला.
It's @bishnoi0056 who provides the much-needed breakthrough for @LucknowIPL ??
He gets his 50th IPL wicket in the form of #MI skipper Rohit Sharma ??
Follow the match ▶️ https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/cgD8aOcwsL
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान