मुंबई | पंजाब किंग्स टीमने मुंबई इंडियन्सवर 13 धावांनी विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने या आव्हानचा पाठलाग करताना जबरदस्त प्रयत्न केले मात्र ते अपूर्ण पडले. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 201 धावा करता आल्या. कॅमरुन ग्रीन आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी मुंबईच्या विजयासाठी जीव तोडून प्रयत्न केले. कॅमरुन ग्रीन याने 67 आणि सूर्याने 57 धावांची खेळी केली. मात्र अखेरीस थोडक्यासाठी मुंबईचे 14 धावांनी प्रयत्न अपुरे ठरले.
मुंबईकडून ग्रीन आणि सूर्यकुमार या दोघांव्यतिरिक्त कॅप्टन रोहित शर्मा याने 44 आणि टीम डेव्हिड याने अखेरपर्यंत नाबाद 25 धावा केल्या. तर इशान किशन याने 1 तर टिळक वर्मा याने 3 धावा केल्या. नेहल वढेरा भोपळाही फोडू शकला नाही. तर जोफ्रा आर्चर 1 धावेवर नाबाद राहिला. मुंबईच्या फलंदाजांनी आणखी जोर लावला असता तर, कदाचित सामना जिंकला असता. पंजाबकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नॅथन एलिस आणि लियाम लिविंगस्टोन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कॅमरुन ग्रीन याने 43 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. तर सूर्याने फक्त 26 बॉलमध्ये 7 रंपाट चौकार आणि 3 कडक सिक्ससह 57 धावा ठोकल्या.
त्याआधी मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विस्फोट पाहायला मिळाला. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना तब्येतीचा फोडून काढला आहे. सामन्याच्या 12 ओव्हरपर्यंत बरोबरीत असलेला सामना पंजाबच्या बाजूने झुकला. त्यानंतर पंजाबने मुंबईच्या गोलंदाजांची सालटी सोलून काढली. पंजाबच्या प्रत्येक फलंदाजाने मिळालेल्या संधीचा मजबूत फायदा घेत तुफान फटकेबाजी केली. हरप्रीत ब्रार याचा अपवाद वगळता पहिल्या सात फलंदाजांनी धमाका केला.
मॅथ्यू शॉर्ट याने 11, प्रभासिमरन सिंह 26, अथर्व तायडे 29, लियाम लिविंगस्टोन 10, भाटीया 41, सॅम करन 55 आणि जितेश याने 25 रन्स केल्या. तर हरप्रीत ब्रार 5 धावांवर रनआऊट झाला. तर शाहरुख खान शून्यावर नाबाद राहिला. मुंबईकडून पियूष चावला आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी प्रत्येकी सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अर्जुन तेंडुलकर, बेहरनडोर्फ आणि जोफ्रा आर्चर या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, टिळक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान (क), जितेश शर्मा (डब्ल्यू), हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.