मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये मंगळवारी सामना पार पडला. या सामन्यामध्ये मुंबई संघाने आरसीबीचा सहा विकेट्स ने धुव्वा उडवला. मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आपल्या वादळी खेळीच्या जोरावर संघाला सहजपणे विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबई गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानी आली आहे. आरसीबी संघाचा पराभव होईल असं सुरुवातीला वाटत नव्हतं. मात्र सूर्याच्या खेळीने सर्व गणितच पालटलं, या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने सूर्याचं कौतुक केलं.
सूर्यकुमार यादव हा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. जेव्हा तो त्या्च्या रंगात येतो तेव्हा त्याला रोखणे कठीण होते. त्याच्यासमोर गोलंदाजी करणेही अवघड आहे. इतके पर्याय असूनही तुम्ही त्याला रोखू शकत नसल्याचं फाफने सांगितलं. त्यांनी पहिल्या 6 ओव्हरमध्ये कमाल फलंदाजी केली. विकेट स्लो झाल्यावर तुम्ही आधी ठरवायला हवं की 6 ओव्हरमध्ये 60 धावा करणं गरजेचं असल्याचंही फाफ म्हणाला.
सूर्याने केवळ 35 चेंडूत 7 चौकार-6 षटकार मारले आणि 237 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 83 धावा केल्या. सूर्यासोबतच ईशान किशनने 21 चेंडूत 42 धावा केल्या, तर नेहल वढेराने 34 चेंडूत 52 धावांची धडाकेबाज खेळी करत आपल्या संघाला 16.3 षटकात 6 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. मुंबई संघ 11 सामन्यांमध्ये 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर आरसीबीला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. आरसीबी संघ 11 सामन्यांत 10 गुणांसह सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड